मला महिन्यातून किमान सात आठ फोन असे येतात आणि पलीकडून विचारणा होत असते कि आम्हाला अमुक अमूक लॅब बनवायची आहे तुम्ही द्याल का ? खर तर हि पैसा कमवायची एक उत्तम संधी असते कारण छानपैकी प्रोडक्टची लिस्ट करून त्यांच्या गळ्यात मारता येते. हे मला करता आल असत कारण हे फोन करणाऱ्यापैकी काहीजनानी केवळ माझ्या विश्वासावर मी सांगेल ते मटेरीयल खरेदी केलं असत आणि मला बर्यापैकी चांगले पैसे मिळवता आले असते पण मी ते नेहमीच टाळल . त्यामुळे काहीजण माझ्यावर नाराज पण झाले .
मला नेहमी वाटत कि लॅब्स ह्या कधीच विकत घेऊ नयेत तर त्या नेहमी महाविद्यालयातच बनल्या पाहिजेत फक्त त्या बनवताना लागणारी मेजरिंग इन्स्ट्रुमेन्ट्स चांगल्या नामांकित कंपनीची असावीत बाकी इतर साधने आज प्रत्येक महाविद्यालयाच्या वर्कशॉप मध्ये असतातच . आज काल जे नवीन विद्यापीठ ,किंवा महाविद्यालये होतात त्यांनी तर स्वतःची लॅब्स स्वतःच बनवली पाहिजे .हि लॅब्स बनवताना शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांचा पण सहभाग पाहिजे. मी काही ठिकाणी हा प्रयोग केलेला पाहिला पण तो इतकासा परिपूर्ण नव्हता पण या वर्षी मी दोन ठिकाणी वर्कशॉपच्या निमित्ताने भेट दिली आणि जे मॉडेल माझ्या मनात होत ते पाहिलं आणि मला खूपच आनंद झाला .
मी तुमच्यापुढे ते शेअर करीत आहे ज्यांना जमेल त्यांनी नक्की पाहावं.
यातलं पहिल आहे ते म्हणजे तोलानी मरीटाईम इस्ट्युटीट, तळेगाव आणि दुसर म्हणजे विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक कॉलेज , इंदापूर . हि दोन मॉडेल अभ्यासण्यासारखी आहेत आणि या दोन्ही ठिकाणची एक गोष्ट कॉमन आहे त्याच्याविषयी मी नंतर लिहीनच.
विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक कॉलेज , इंदापूरच्या इ अँड टी सी डिपार्टमेंटला ज्यावेळी हँड्स ऑन वर्कशॉपच्या निमित्ताने भेट दिली त्यावेळी पहिल्या सेशननंतरच एक कुठूनतरी जाणवत होत कि हि पोर जरा जास्तच हुशार आणि टेक्निकली साउंड आहेत. प्रत्येक जण मल्मीमीटर , सोल्डरिंग गन घेउनच असतो. दुपारी सहज हा विषय HoD सोमनाथ चिकणे सर यांच्या बरोबर गप्पा मारताना निघाला . सर म्हणाले मी उद्या तुम्हाला आमच्या लॅब्स दाखवतो मग बोलु. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर आम्ही त्यांच्या लॅब्स बघायला लागलो आणि मी ज्याचा विचार करत होतो ते समोरच दिसलं आणि खूपच आनंद झाला. सांगायची गोष्ट म्हणजे या डिपार्तमेंटच्या सगळ्या लॅब्स या विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून बनवल्या आहेत . अगदी छोट्या किट्स पासून ते मायक्रो कंट्रोलर किट्स ते मोठी पी एल सी ट्रेनिंग किट्स ,टी व्ही ट्रेनिंग किट्स डीपार्र्मेंट मध्ये डिप्लोमाच्या मुलांनी बनवलेली आहेत हे पाहून अगदी मन भरून आल.
अगदी पी सी बी सुद्धा स्वतः डिझाईन करून , फेरीक क्लोराईडमध्ये इचिंग करून बनवले होते . त्याची पी सी बी ची लॅब्स बघितली तर अस वाटत होत कि पी सी बी कंपनीत आलो कि काय इतके फेरीक क्लोराईडनी माखलेले टब होते , फरशी फेरीक क्लोराईडने डागाळलेल्या होत्या . पाहिल्यावरच कळत होत कि भरपूर पी सी बी बनले असतील . तुम्हाला वाटेल कि यांच्याकडे मशिनरी असेल पण नाही . फेरीक क्लोराईडचे टब आणि ड्रील मशीन एव्हढच साहित्य आहे लॅब मध्ये . त्यांनी मोठे पी सी बी बनवण्यासाठी शोधलेली पद्धत पाहुन तर मी चाट पडलो . यांनी पी सी बी डिझाईन सॉफ्टवेअरमध्ये केलं मग त्याची इमेज त्यांनी रेडियम नंबर प्लेट करणार्याकडून कट करून आणली आणि ते रेडियम ची पोझीटीव्ह कॉपर क्लॅडवर चिटकवून ते पी सी बी इचिंग करून घेतले . एखादी गोष्ट करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक गोष्टीला पर्याय मिळतात हे इथ पदोपदी दिसत होत . कित्येक महाविद्यालयात दहा दहा लाखाच्या मशिनरी असणाऱ्या लॅब्स पेक्षा दहा हजार रुपये पेक्षा कमी खर्च आलेल्या मशिनरीनी बनवलेली हि लॅब हजार ( दहा हजार म्हणायचं होत ) पटीने जास्त कार्यरत होती .
प्रत्येक लॅब मध्ये दहा टक्केपेक्षा जास्त किट्स विकतची तयार घेतलेली नव्हती . सरांनी सांगितल्यानुसार इथ पहिल्या वर्षीपासूनच विद्यार्थ्याला असे प्रोजेक्ट दिले जातात ज्यांचा लॅब्स साठी काहीतरी उपयोग होतो. म्हणजे फायनल ईअरच्या प्रोजेक्टसाठीची कॅबिनेट अगदी पहिल्या वर्षी वर्कशॉपमध्ये कार पेंटरीचा जॉब करत असतानाच तयार होते. सगळ काही नियोजनबद्ध होत . कुठलीहि गोष्ट वाया जाणार नाही याची खबरदारी घेतली होती.
सांगण्यासारख बरच आहे आणि त्यांचा संदर्भ नंतरच्या लेखात देईनच.
तिथ असणाऱ्या इतर डिपार्टमेंटमध्ये पण अशा प्रकारची डेव्हलपमेंट झालेली आहे अस कळल पण वेळेअभावी प्रत्यक्षात पाहिलं नाही त्यामुळे त्याविषयी लिहित नाही .
शेवटी प्रिन्सिपल डॉ. सुजय देशमुखसरांच्या बरोबर बोलताना त्यांनी सांगितलं कि त्यांनी काही शिक्षकांना उद्योग रजिस्टर करून जी एस टी नंबर काढायला सांगितला आहे कारण काही काम त्यांच्याकडे आहेत ( त्यांनी सांगितली मला पण ती सांगण्यासाठी मी परवानगी घेतलेली नाही त्यामुळे मला इथ सांगता येत नाहीत ) . जर असे तयार शिक्षक आणि काम करण्यासाठी चांगली प्रशिक्षित आणि महत्वाचे म्हणजे उत्साही विद्यार्थ्यांची टीम असेल तर त्याना नक्कीच यश मिळेल या बद्दल खात्री आहे . त्यांना शुभेच्छा.
See insights



