Dear Engineers
We Create, We Preserve, We Recycle, We are THE Engineers........... हे अभियंत्या... तू निर्मिती करतोस- तु ब्रम्हास्वरूप आहेस, तु पालन करतोस - तु विष्णुस्वरूप आहेस, त तू पुनः निर्मितीसाठी नाश करतोस - तु शिव स्वरूप आहेस. जगाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणे हे तुझे कर्म आहे आणि नित्य नवीन आव्हानाचा सामना करणे हेच तुझे कर्तव्य आहे. - चित्तरंजन महाजन,डॉल्फिन लॅब्स, पुणे. मला अभिमान आहे अभियंता असल्याचा ...
Wednesday, April 16, 2025
**** लॅब्स डेव्हलपमेंट - भाग -1 ****
Tuesday, September 3, 2024
### कोडिंगचे लॅपटॉप ###
### कोडिंगचे लॅपटॉप ###
गेले बरेच महिने मी नवीन लॅपटॉप घ्यायचा विचार करत होतो. आपल मोबाईल फोन आणि लॅपटॉप याबद्दल आधीच ठरलं आहे कि मोबाईल फोन हा दर तीन वर्षांनी आणि लॅपटॉप हा दर चार वर्षांनी नवीन घ्यायचा . मोबाईल फोन हा पंधरा हजार रुपये आणि लॅपटॉप हा तीस हजारच्या आतच घ्यायचा .
आता सध्या वापरत होतो तो लॅपटॉप २०१८ मध्ये घेतला होता . त्यावर इलेक्ट्रोनिक्स आणि मेकॅनिकलसाठी लागणारी सगळी सॉफ्टवेअर अजूनही गुण्यागोविंदाने चालत होती तरीपण वाटलं नवीन घ्यावा . आता नवीन घ्यायचं म्हणजे शोधाशोध आली . वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मी वर्कशॉप घेत असतो त्यामुळे बऱ्याच प्रकारचे लॅपटॉप दिसतात मग मुलांनाच विचारायचो कितीला घेतला? . प्रत्येकजण सत्तरहजारच्या वरचीच किंमत सांगायचा .
गेल्या दोन वर्षात साठ हजाराच्या खाली किमतीचा लॅपटॉप घेतलेला कुणीही भेटला नाही त्यातच मध्यंतरी चीनमधून आयात बंद केल्याने लॅपटॉपच्या किंमत वाढल्या असही कळल होत . आजकाल पेपरमध्ये पण ज्या जाहिराती येतात त्यामध्येपण ऐंशी हजाराच्यावरच लॅपटॉपच्या किमती असतात . आता काय करायचं? कसतरी पन्नास हजार पर्यंत बजेट वाढवलं पण कुठला लॅपटॉप घ्यायचा ते सुचेना .
शेवटी पोराला म्हटलं एखादा पन्नासच्या खाली चांगला लॅपटॉप शोधून काढ . त्याला विचारल्यावर त्याने झटदिशी नेटवरून शोधून काढलं आणि म्हणाला सध्या १६ जीबी राम आणि ५१६ जीबी एस एस डी मेमरीचा लॅपटॉप ४०००० च्या खाली मिळतोय आणि त्यान शोधून पण काढलं कि कुठे मिळतोय? . मग त्याला घेउनच मी शोरूम ला गेलो .
तिथ गेल्यावर लगेच आमच एका सेल्समनने स्वागत केलं . मग माझ्या मुलांकडे पहात विचारलं लॅपटॉप कोडिंगला पाहिजे का ? अर्थात आम्ही होय म्हटल्यावर तो एका बाजूला घेउन गेला . लय भारी भारी लॅपटॉप दाखऊ लागला . सगळे ऐंशी हजाराच्या आसपासच्या किमतीचे होते . मला परत टेन्शन, माझी चुळबुळ सुरु झाली . सेल्समन माझ्याकडे बघतच नव्हता त्याच लक्ष्य माझ्या मुलाकडे होत आणि मुद्दा कोडिंग वरून गेमिंग वर आला आणि हे लॅपटॉप गेमिंगसाठी कसे भारी आहेत ते सांगू लागला . कमी कमी करत त्याने ६५००० हजारच्या पर्यंतचे लॅपटॉप दाखवायला सुरुवात केली .
मला हे कळेना कि कोडिंगसाठी गेमिंग लॅपटॉप कशाला पाहिजे . मग मी मुलाला त्याने शोधून काढलेल्या लॅपटॉपविषयी विचारायला सांगितलं मग काय ? सेल्समनच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला त्याने दुसरा सेल्समन बोलावलं आणि आमच्याबरोबर पाठवला . एका कोपऱ्यात हे लॅपटॉप ठवले होते .अगदी यांची रेंज १८००० रुपये पासुन सुरु होत होते. सध्या मी वापरत असलेल्या लॅपटॉपपेक्षा चागले फीचर्सअसणारा लॅपटॉप अगदी पंचवीस हजाराच्या आत येत होता .
हे सर्व चालल असताना एक साध कुटुंब आल . अठरा एकोणीस वर्षाच पोरग सोबत पंचवीस वर्षाच पोरग, आई वडील आणि सोबत वडिलांचा मित्र असावा. ते आत आलेवर लगेच मघाचा सेल्समन त्यांचेकडे गेला.. त्यांना विचारलं कि लॅपटॉप कुणाला पाहिजे ,तर लॅपटॉप त्या एकोणीस वर्षाच्या मुलाला पाहिजे होता. तो इंजीनियरिंग करत होतो . दुसऱ्या वर्षात शिकत होता... मग काय त्याला सावज मिळालं . दुसरा मुलगा हा त्याचा भाऊ होता आणि सध्या तो आय टी मध्ये होता . कोडिंग वरून विषय गेमिंगवर आला आणि शेवटी नव्वद हजाराच्या पुढचा झगमगीत लायटिंग दिसणारा लॅपटॉपघेउन लगेच गेले.... आणि मला महाग लॅपटॉप गुपित कळल ,खुपच वाईट वाटलं .
आजकाल लोकांच्या हातात पैसा बऱ्यापैकी खेळायला लागला आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनाची महाविद्यालयाचा सुकाळ झाला आहे त्यामुळे मेरीट हि पद्धत बंद होत चालली आहे. आजकाल एडमिशन पण लगेच मिळतात .एकदा अडमिशन घेतलं कि इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला पोरग गेलं कि त्याची लॅपटॉपसाठी पिरपिर सुरु होते. पालकाना पण कौतुक वाटत आणि आपलं पोरग अभ्यासात माग पडू नये म्हणून मुकाटपणे त्यांने दाखवेल तो लॅपटॉप गपगुमान घेऊन देतात. खरच एव्हढ्या महागड्या लॅपटॉपची गरज असते का?
बऱ्याच वेळा लॅपटॉप हा एकदा चांगला घेतला कि पुढ पाच सहा वर्षे बघायला नको असंही त्याचं मार्केटिंग केलं जात . तस बघायला गेल तर तीन वर्षात तंत्रज्ञान इतकं बदलेलं असत कि एकदाच महागडा लॅपटॉप घेण्याऐवजी दर तीन वर्षांनी दोन स्वस्त लॅपटॉप घेण कधीही परवडत .
आज ज्यावेळी मी ट्रेनिंग घेत असतो तर अगदी गावाकडच्या विद्यार्थ्याकडेपण लॅपटॉप असतो. किबहुना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासाठी लॅपटॉप हा अनिवार्यच झाला आहे पण खरंच मुलांना लॅपटॉप वापरता येतो का ? अगदी शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्याला सुद्धा लॅपटॉप वापरता येत नाही . अगदी कंप्युटर इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याना सुद्धा विंडोज किती बिट्सची आहे , ऑपरेटिंग सिस्टीम कशी टाकावी ? अगदी डिस्क पार्टिशन कस कराव इतकीही माहिती नसते .
आज पाहिल्यासारखे लॅपटॉप मेंटेन करण एव्हढ अवघड राहिलेले नाहीत पण महागडा लॅपटॉप घेतला आहे म्हणून त्याला इतकं जपलं जात कि त्याच्यावर काही प्रयोग केले जातच नाहीत . अगदी त्याच्या कि बोर्डवरच कव्हर तीन वर्षानंतर पण तसच असत म्हणजे लॅपटॉपचा वापर जास्त केला जात नाही.
२०१० पूर्वी मुलांच्या लॅपटॉप मध्ये सोफ्टवेअर , पिक्चर आणि टेक्निकल पुस्तकांचा भरणा असायचा . त्यानंतर हळूहळू सोफ्टवेअर आणि टेक्निकल पुस्तके कमी होउ लागली आणि aptitude परीक्षा आणि मोटिव्हेशनल पुस्तकांची संख्या वाढू लागली , हार्ड डिस्कचा साठवणूक क्षमता वाढू लागलेने पिक्चर हि वाढू लागले. २०१५ नंतर टेक्निकल पुस्तके कमी झाली आणि यु ट्युब च्या व्हिडीओ, ओ टी टी वरच्या वेब सेरीज आणि त्याचबरोबर गेम्सचा भरणा वाढू लागला .लॅपटॉप हे शिकण्याच साधन कमी झालं आणि मनोरंजनाच साधन झालं.
आज जर पाहिलं (बघा जरा सहज सर्वे करून ) तर बऱ्यापैकी लॅपटॉपवर गेमिंगची सोफ्तवेअर आणि वेब सेरीज यांचाच भरणा दिसतो. अलीकडे लॅपटॉप हा शिकण्यासाठी कमी आणि गेमिंग साठीच घेण्याच प्रमाण वाढलं आहे .
कोडिंग च्या नावाखाली गेमिंगचे लॅपटॉप घेण्यामध्ये पालकांच्या पैशाची नासाडी होत चालली आहे .
Wednesday, August 28, 2024
#### यु. एस. बी. ने लावली इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग शिक्षणाची वाट #####
#### यु. एस. बी. ने लावली इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग शिक्षणाची वाट #####
हो चक्रावलात ना ? पण हे सत्य आहे. आज इलेक्ट्रोनिक्सच्या क्षेत्रात एव्हढी मोठी संधी आहे पण प्रत्येकाला वाटत कि आय. टी. मध्ये गेलं तरच आपल भलं होईल . आज इलेक्ट्रोनिक्सला एडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पण इलेक्ट्रोनिक्स शिकण्यामध्ये काही इंटरेस्ट उरलेला नाही . ए आय , कंप्युटर गेला बाजार आय टी ला प्रवेश मिळाला नाही म्हणून नाईलाजाने इलेक्ट्रोनिक्सला ऍडमिशन घेतो कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आय. टी. कंपनीत प्लेस होतो . जर नाही झाला तर नंतर सोफ्टवेअरचे कोर्स करतो आणि शेवटी आय. टी. उद्योगात अभिमानाने प्रवेश करतो . एखाद दुसरे विद्यार्थी असतात ज्यांना कोअरमध्ये जायचे असते पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्यांची पूर्वतयारी होत नाही म्हणून नाईलाजाने ते पण शेवटी आय. टी. मध्येच जातात.
आज प्रत्येक क्षेत्रात इलेक्ट्रोनिक्स आहे आणि याचा विचार न करता काही विद्यापीठांनी तर इलेक्ट्रोनिक्सच्या अभ्यासक्रमामध्ये पण आय. टी. ला पुरक ठरणारे विषय टाकण्याचा आणि त्यासाठी इलेक्ट्रोनिक्सचे महत्वाचे विषयांचा बळी देण्याचा मूर्खपणा केला आहे. इलेक्ट्रोनिक्स शिक्षण क्षेत्र आपलं अस्मिता विसरून गेलं आहे . कधी कधी याला कारण का याच एक मजेदार उत्तर मी सांगतो कि इथं सगळी सर्कीटच आहेत . चला विनोदांच बाजूला ठेवू या आणि मूळ विषयाकड परत येउ या .
सर्वसाधारणपणे २००८ ते २०१२ च्या सुमारास इलेक्ट्रोनिक्स शिक्षणाचा अभ्यासक्रम हा अत्युच्य पातळीवर होता .(आताचा म्हणाल तर त्याच्या तुलनेत कचराच आहे ...त्याबद्दल नंतर कधीतरी) आज ज्या गोष्टींचा बोलबाला आहे त्या एम्बेडेड सिस्टीम , व्ही एल एस आय , आय सी डिझाईन , आय ओ टी अशा गोष्टी त्या काळात होत्या आणि महत्वाचे म्हणजे यांचे प्रॅक्टिकल पण अतिशय गंभीरपणे व्हायची. मूलंपण छान प्रोजेक्ट करायची.
पण तेव्हढ्यात एक घोटाळा झाला . सर्व महाविद्यालयात नवीन संगणक येउ लागले आणि या संगणकाना सिरीयल पोर्ट आणि पॅरॅलल पोर्ट यायचं बंद झालं होत . आता यु एस बी पोर्ट येउ लागलं होत . महाविद्यालयात असणाऱ्या ८०५१ मायक्रोकंट्रोलरना प्रोग्राम करण्यासाठी सिरीयल पोर्ट तर एफ. पी. जी. आय. प्रोग्राम करण्यासाठी पॅरॅलल पोर्टची गरज असायची मग आता काय? . मग जुनेच संगणक वापरण चालू होत . ते पण घाईला येउ लागले . कॉलेजची कीट्स हि लवकर बदलता येत नव्हती नुकतीच नवीन घेतली होती आणि एकदा घेतली तर पुढचे दहा वर्षे तरी ती बदलली जात नाहीत . आता आला का प्रॉब्लेम . त्याच वेळी बाजारात यु एस बी ते सिरीयल कन्व्हर्टर पण आले पण त्याची वेगळीच गंमत . त्याचे ड्रायव्हर मॅच व्हायचे नाहीत.कधी कधी एका पी सी वर व्हायचे तर दुसऱ्या पीसी वर चालायचेच नाहीत . त्यामुळे आता जरी प्रोग्राम डाउनलोड झाला तर पुढच्यावेळी होईल अशी शाश्वती नसायची . एकच गोंधळ उडाला. त्यामुळे झाल काय जो मायक्रोकंट्रोलरचा पाया शिकण्यासाठी जो सगळ्यात सोपा ८०५१ मायक्रोकंट्रोलर जो होता त्याची किट्सवरील प्रात्यक्षिक बंद करून त्याला हळूहळू सिम्युलेटर वर शिकवायला सुरुवात झाली . त्याच महत्व कमी करायला सुरुवात झाली.
त्याच्या ऐवजी पी. आय. सी. मायक्रोकंट्रोलरला महत्व जास्त द्यायला सुरुवात झाली अर्थात तो हि महत्वाचा कंट्रोलर आहे पण ते म्हणजे ज्यांना बडबड गीते जमत नाहीत त्याना कालिदासाची महाकाव्ये शिकवण्याचा प्रकार झाला . मुलांना ते काही कळेना . आता कोणी कबुल करणार नाही पण जवळजवळ ९९% शिक्षकांना पण पी आय सी मायक्रोकंट्रोलर येत नाही ( तसा तो सोपा पण नाही आणि पन्नास मार्काच्या अभ्यासक्रमात बसण्याइतका सहज नाही ). मग आता ८ बिट्सचा ८०५१ कळत नाही त्याना ३२ बिट्सचा आर्म कंट्रोलर कसा काय कळणार? ज्यांना पेरिफेरल कसे चालतात हेच कळत नाही तर त्यांना डिजिटल आय.सी. कसे डिझाईन करता येणार? असा एकच गोंधळ उडाला.
आता नवीन बोर्ड जे बाजारात येत आहेत ते चांगले आहेत आणि यु एस बी पोर्ट चांगले चालतात पण मधल्या काळात हळु हळू मायक्रोकंट्रोलर हा विषय शिकवण्याचा आत्मविश्वास इलेक्ट्रोनिक्स शिक्षण क्षेत्र गमावुन बसलं. आता मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिकवण्यातल कौशल्य संपल केवळ पाटी टाकायचं काम उरलं आहे.
एम्बेडेड सिस्टीम ,एफ. पी. जी. ए. प्रोग्रामिंग हे विषय आता ऑप्शनला टाकले जात आहेत . मग आता सांगा जगावर राज्य करणारी एम्बेडेड सिस्टीम ज्याचा मेन चालक मायक्रोकंट्रोलर त्यालाच कसं प्रोग्राम करायचं हे जर शिकलं नाही तर नोकऱ्या कशा मिळणार ?
कळल का यु एस बी मुळे निर्माण झालेला एक मोठा प्रॉब्लेम .......?
तुमची प्रतिक्रिया अवश्य मांडा.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे
Thursday, May 9, 2024
****** भारतीय परंपरा , मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ********
*
^^^^^^नवीन शिक्षण पद्धती – अमुलाग्र बदलाची गरज ^^^^^^
**** आकाशी झेप घे रे पाखरा ********
Sunday, November 19, 2023
माझा विद्यार्थी .... माझ प्रॉडक्ट
परवा DIDAC बेंगलोर ला गेलो होतो सहज एका स्टॉलला भेट दिली . त्यावेळी सगळ बोलन झालेवर त्यांनी मला विचारलं कि तुमचं प्रॉडकट काय आहे . मी म्हणालो ज्यान हे तुमचं प्रोडक्ट बनवलं तो माझ प्रोडक्ट . त्या ते विचारात पडले मी म्हणालो "मी महाजन सर , डॉल्फिन लॅब्स". अस म्हटल्यावर ते चकित झाले .डॉल्फिन लॅब्सचा मेंबर त्या कंपनीत मॅनेजर होता. ते खुश झाले आणि त्यांनी त्या मेंबरविषयी कौतूकान बोलायला सुरुवात केली . खर तर त्यान डॉल्फिन लॅब्स च्या प्रोडक्टचीच कॉपी मारली होती. आजपण कितीतीतरी मेम्बरच काय शिक्षक पण डॉल्फिन लॅब्स ची कॉपी मारतात. काही काही तर डॉल्फिन लॅब्सचे विचार, माहिती पत्रे सुद्धा निर्लज्यपणे कॉपी ,मारतात. मला वाईट वाटत नाही उलट अभिमान वाटतो. कि त्यांना काहीतरी मार्ग मिळाला. याचाच परिणाम पुढे असा होतो कि ते कुणावरही विश्वास ठेउ शकत नाहीत आणि हाच मला वाटत त्यांना मिळालेला शाप असतो.
असू दे ,तर हा मेंबर माझाच विद्यार्थी होता . पहिल्या वर्षाचा MATHS विषय राहिला त्यामुळे त्याला तिसऱ्या वर्षात परीक्षा देता आली नाही . मग आता वर्ष तर वाया जाणार म्हणून त्यान लॅब जॉईन केली . डॉल्फिन लॅब्सच्या साच्यात ढळत गेला . त्यान कष्ट पण चांगले घेतले आणि डॉल्फिन x नावाची लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम पण बनवली . कॉलेजमध्ये NAAC कमिटी आली तेव्हा त्यान त्याच प्रेझेन्टेशन पण केलं होत अर्थात त्यावेळी तो इयर डाउन होता. त्याला त्यावेळी मराठी बोलता येत नव्हत पण माझेसोबत राहून नंतर तोपण पाचशे पाचशे विद्यार्थ्यांच्या बॅचेस मराठी मध्ये घेण्यात तरबेज झाला .
लॅब मेंबर म्हणजे आम्मुहीलाप्रमाणे सांभाळत असतो पार माझ्या घराच्या किचनपर्यंत मुक्त प्रवेश त्यामुळे त्याच्या पाक कौशल्याचा विशेष म्हणजे माशांच्या पाककृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला .
पुढे त्यान चांगल नाव कमावलं. आज तो पण एक ब्रांड झाला आहे . अजूनही आमची भेट होते. डॉल्फिन लॅब्स्चे असे कितीतरी मेंबर वेगवेगळ्या क्षेत्रात नाव काढत आहेत आणि त्यांचेविषयी जेव्हा त्यांचे जवळचे , त्यांचे सिनियर कौतुक करतात त्याचबरोबर डॉल्फिन लॅब्स्चे नाव पण कौतुकाने घेतात त्यावेळी अस वाटत कि बरच काही मिळवलं .
अर्थात हे सगळ शिकलो ते माझ्या शिक्षकाकडून . मी शिकत असताना मला सुद्धा काही शिक्षकांच्या घरी मुक्तद्वार प्रवेश होता. मी आजही मानतो कि शिक्षकाच घर हे विद्यार्थ्यासाठी त्याच स्वतःच घर असलं पाहिजे , आयुष्यात शिक्षक जे पदव्या , पुरस्कार मिळवतात त्याऐवजी आपण किती विद्यार्थी स्वतः घडवले त्याचा पण त्यानी स्वत : ताळेबंद बांधला पाहिजे .
एखाद्याच आयुष्य घडवन याच्याइतकी अचीव्हमेंट कुठलीही नाही. आणि असं आयुष्य घडवन ज्यामध्ये अनेकांची आयुष्य घडतील ते म्हणजे आयुष्याच सार्थकच म्हटलं पाहिजे .



