Friday, May 8, 2015

थेट मनापासुन

थेट मनापासुन.....
           सर्वात प्रथम मी माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत करत आहे. मी चित्तरंजन महाजन , मी  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहे.  डॉल्फिन लब्स या नावाने माझी पुण्यामध्ये नऱ्हे इथे संस्था आहे. या संस्थेमार्फत  एंबेडेड आणि व्ही . एल. एस. आय.  सिस्टीम  बाबत  ट्रेनिंग दिले जाते. वेगवेगळ्या उपकरणांची ची निर्मिती केली जाते. तसेच संशोधनही केले जाते. दोन वर्षात  आम्ही पाच पेटंटसची नोंदणी केली आहे.  
          ट्रेनिंगच्या निमित्ताने आम्ही बऱ्याच इंजिनीरिंग कॉलेजमध्ये आणि पोलीटेक्निक आणि शाळामध्ये जात असतो. त्यावेळी आमच्या  लक्षात आले कि विद्यार्थ्यांना आमचे ट्रेनिंग खुप आवडते आणि त्यांना  पुढे काहीतरी करायचे असते शिवाय त्याना आम्ही सांगत असलेल्या पुस्तकाबाहेरच्या संकल्पना खूपच आवडतात तसेच आमचे  विचार त्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे या संकल्पना  व   विचार सर्वांपर्यंत  पोहोचावेत या उद्देशाने हा ब्लॉग सुरु केला आहे.