Sunday, November 19, 2023

माझा विद्यार्थी .... माझ प्रॉडक्ट

 परवा DIDAC बेंगलोर ला गेलो होतो सहज एका स्टॉलला भेट दिली . त्यावेळी सगळ बोलन झालेवर त्यांनी मला विचारलं कि तुमचं प्रॉडकट काय आहे . मी म्हणालो ज्यान हे तुमचं प्रोडक्ट  बनवलं तो  माझ प्रोडक्ट . त्या ते विचारात पडले मी म्हणालो "मी महाजन सर , डॉल्फिन लॅब्स". अस म्हटल्यावर ते चकित झाले .डॉल्फिन लॅब्सचा मेंबर त्या कंपनीत मॅनेजर होता. ते खुश झाले आणि त्यांनी त्या मेंबरविषयी कौतूकान बोलायला सुरुवात केली . खर तर त्यान डॉल्फिन लॅब्स च्या प्रोडक्टचीच कॉपी मारली होती.  आजपण कितीतीतरी मेम्बरच काय शिक्षक पण डॉल्फिन लॅब्स ची कॉपी मारतात. काही काही तर डॉल्फिन लॅब्सचे विचार, माहिती पत्रे सुद्धा निर्लज्यपणे कॉपी ,मारतात. मला वाईट वाटत नाही उलट अभिमान वाटतो. कि त्यांना काहीतरी मार्ग मिळाला. याचाच परिणाम पुढे असा होतो कि ते कुणावरही विश्वास ठेउ शकत नाहीत आणि हाच मला वाटत त्यांना मिळालेला शाप असतो.

असू दे ,तर हा मेंबर माझाच विद्यार्थी होता . पहिल्या वर्षाचा MATHS विषय राहिला त्यामुळे त्याला तिसऱ्या वर्षात परीक्षा देता आली नाही . मग आता वर्ष तर वाया जाणार म्हणून त्यान लॅब जॉईन केली . डॉल्फिन लॅब्सच्या साच्यात ढळत गेला . त्यान कष्ट पण चांगले घेतले आणि डॉल्फिन x नावाची लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग  सिस्टीम पण बनवली . कॉलेजमध्ये NAAC कमिटी आली तेव्हा त्यान त्याच प्रेझेन्टेशन पण केलं होत अर्थात त्यावेळी तो इयर डाउन होता. त्याला त्यावेळी मराठी बोलता येत नव्हत पण माझेसोबत राहून नंतर तोपण पाचशे पाचशे विद्यार्थ्यांच्या बॅचेस मराठी मध्ये  घेण्यात तरबेज झाला . 

लॅब मेंबर म्हणजे आम्मुहीलाप्रमाणे सांभाळत असतो पार माझ्या घराच्या किचनपर्यंत मुक्त प्रवेश त्यामुळे त्याच्या पाक कौशल्याचा विशेष म्हणजे माशांच्या पाककृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला .

पुढे त्यान चांगल नाव कमावलं. आज तो पण एक ब्रांड झाला आहे . अजूनही आमची भेट होते. डॉल्फिन लॅब्स्चे असे कितीतरी मेंबर वेगवेगळ्या क्षेत्रात नाव काढत आहेत आणि त्यांचेविषयी जेव्हा त्यांचे जवळचे , त्यांचे  सिनियर कौतुक करतात त्याचबरोबर डॉल्फिन लॅब्स्चे नाव पण कौतुकाने घेतात त्यावेळी अस वाटत कि बरच काही मिळवलं . 

अर्थात हे सगळ शिकलो ते माझ्या शिक्षकाकडून . मी शिकत असताना मला सुद्धा काही शिक्षकांच्या घरी मुक्तद्वार प्रवेश होता. मी आजही मानतो कि शिक्षकाच घर हे विद्यार्थ्यासाठी त्याच स्वतःच घर असलं पाहिजे , आयुष्यात  शिक्षक जे पदव्या , पुरस्कार मिळवतात त्याऐवजी आपण किती विद्यार्थी स्वतः घडवले त्याचा पण त्यानी स्वत : ताळेबंद बांधला पाहिजे . 

एखाद्याच  आयुष्य घडवन याच्याइतकी अचीव्हमेंट कुठलीही नाही. आणि असं आयुष्य घडवन ज्यामध्ये अनेकांची आयुष्य घडतील ते म्हणजे आयुष्याच सार्थकच म्हटलं पाहिजे .




Wednesday, October 25, 2023

^^^^^ ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा

 २००१ ची गोष्ट असेल . माझा एक मित्र जालिंदर पाटील हा बेंगलोरला जॉबला लागला होता . त्याने मला बेंगलोरला नेले. तिथ गेल्यावर मला कळल कि याला जॉब वगैरे काहीही नाही . घरी दाबात सांगितलं होत कि विप्रोमध्ये आहे पण तिथ त्याला कसलाही जॉब नव्हता. खर तर त्याची मानसिक अवस्था बिघडली होती. निव्वळ पुस्तक वाचत रूमवर बसायचा ( जालिंदर पाटील हा एक वेगळाच लेखाचा विषय आहे मी यावर लिहीनच ). नवीन स्वप्न रंगवायचा . जॉब कन्सल्टन्सी मधून इंटरव्यू फॉर्म आणायचा पण पुढे काहीही नाही . अगदी त्याचा आत्मविश्वास गमावुन गेला होता . दोन तीन दिवसात मलाच त्याच टेन्शन आल . ज्याच्या भरोशावर आलो तोच अधांतरी होता मग काय ? माझे तर बी ई चे विषय राहिले होते . काय करायचं ? माग तर येउ शकत नव्हतो . काय करायचं कळना? जवळ पैसे तर नाहीत याला मागावे कसे ?

आणखी दोन तीन दिवस वाट पाहिली तोवर याने दोन तीन  कंपनीचा इंटरव्यूसाठी फॉर्म आणला होता . त्यातली एक कंपनी ,जी जवळच होती  आणि तिच्या  नावात सर्विस होत मग मनाचा  हिय्या केला आणि त्यातला एक फॉर्म घेतला  आणि  कृती कम्प्युटर सर्विस राजाजीनगर येथे गेलो. कंपनी एच. पी. चे प्रिंटर , प्लोटर सर्विस करायची . त्यावेळी बेंगलोरला इतक हिंदी चालायचं नाही . कन्नड आणि इंग्लिश . आमच इंग्लिश म्हणजे काय सांगायला नको . बरेच जण आले होते. इंटरव्यू घ्यायला मालकच होते वेंकटेश त्याचं नाव . इंग्रजीतून सुरुवात झाली . माझ काय त्यांना किती समजत होत काही कळत नव्हत . शेवटी ते म्हणाले . You dont understand Kannada , you dont speak English ,how you can work for us?

प्रश्न खतरनाक ... दोन सेकंद विचार केला आणि म्हणालो . Sir, I dont understand Kannada , I cant speak English but I can understand what that Machine says and I know how to take care of machine.  उत्तर झन्नाट दिल . थोडावेळ ते विचारात पडले . मग मला थोडावेळ बाहेर थांबायला सांगितले . मग थोडावेळ त्यांच्या सर्विस इंजिनियर्सशी डिस्कस केले आणि मी सिलेक्ट झालो .

पुढचे पंचवीस दिवस मी जालिंदर पाटील या नावाने काम केले . या दिवसात मी जीवाचे रान करून त्यांना माझी निवड योग्य होती हे दाखवून दिले . खुश होते माझेवर . दहा तारखेला पगार झाला . अकरा तारखेला मी त्यांना सांगितले कि मी बी ई नापास आहे आणि माझे नाव जालिंदर पाटील नसुन मी चित्तरंजन महाजन  आहे . त्यांनी आश्चर्याने पाहिले पाच दहा मिनिटे कन्नड मध्ये झापझाप झापले . ते विसरून गेले कि मला कन्नड जास्त कळत नाही (थोडफार कळत होत  दोस्त मल्लापाची कृपा ) . शेवटी मला म्हणाले कि माझ्या ओरिजिनल नावाने काम कर .....

आणि बेंगलोर मध्ये कामाला सुरुवात केली ...

********

परवा DIDAC ला गेलो होतो . असाच एकाने स्टॉल घेतला होता त्यातच मला जागा दिली होती. हे सगळ अचानकच झाल त्यामुळे मला काही तयारीपण करता आली नाही. जे काही माझेजवळ होत ते घेउन गेलो होतो . स्टॉल मध्ये माझे मटेरियल लावले . आणि सहजच फिरून आलो . बघतोय तर काय इतर स्टॉल पुढे माझ मटेरियल म्हणजे चकचकीत  मॉल बाहेर एखादा गावाकडचा गावढळ गावठी भाजी घेउन बसतो तशी झाली . काय करायचं ज्यान नेलं त्यालाही माझेविषयी कशाला याला आणल अस वाटल . माझी तर अवस्था खूपच बिकट झाली होती त्यातच तीनचार ओळखीचे भेटल्यावर तर खूपच लाजल्यासारखं झाल पण मनात म्हटलं यांना कुठ माहित आहे डॉल्फिन लॅब्स काय आहे ती . चार पाच वाजेपर्यंत माझ्या लक्षात  आले कि बाकीच्यांनी त्यांची किट्स हि धंदा म्हणून बनवली होती पण माझी किट्स हि मुलांना समजण्यासाठी मी विशेष संशोधन करून बनवली होती . अटल टिंकरिंग लॅब्स ची जशी महाराष्ट्रात अवस्था आहे तशीच इतर राज्यात पण आहे . नुसत चकचकीत लॅब्स फुलली लोडेड सगळीकडे आहे पण युटीलायझेशन जवळजवळ शून्य . मला यु एस पी दिसला .

रात्रभर विचार केला . सकाळी राजाजी नगरला गेलो . वेंकटेश सरांना भेटलो . त्यांनी सुरुवातीला ओळखलं नाही पण थोडीफार त्यांना लिंक लागली . त्याच्या पाया पडलो आणि विचार केला. I am Engineer..... I can do anything.

दुसऱ्या दिवशी बॅटिंग सुरु केली चांगला रीस्पोंस मिळाला . माझ इंग्लिश काही अजुन सुधारलेलं नाही पण पुढच्याला जो विश्वास द्यायचा तो आपल्याजवळ होता. मनात म्हटलं बाकीचे लोकं बकरे शोधात आहेत आणि माझा दृष्टीकोन त्यांच्या सारखा नाही . दोन दिवसात बरंच काही घडलं. हळूहळू मी सांगेनच.

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा .... काय भुललासी वरलिया डोंगा ...

आमच इंग्लिश डोंग ... आमची कीटस कदाचित असतील डोंगी ,पण आमचा हेतू तर सरळच आहे. 

Wednesday, September 27, 2023

((((( Out of Box Thinking - अभ्यासक्रम आणि मानवी उत्क्रांतीशी स्पर्धा )))))

 


 ज्यावेळी मी पहिल्यांदा या शिक्षण क्षेत्रात २००७ साली  आलो त्यावेळी  एका अभियांत्रिकी महाविद्यालयात जॉईन झालो होतो . तिथ एक पहिल्यांदा प्रकार बघितला. त्या कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणजे अती हुशार (त्यांच्या मते ) होते. दर मिटींगला काहीतरी नवीन आयडिया मांडायचे . माझी पहिलीच मिटिंग होती .मी सगळ्यात पहिल्या रांगेत बसलो होतो  होतो .  त्यांनी कल्पना मांडली आणि म्हणाले कोण कोण तयार आहे यासाठी . मला काही कळल नाही . ती कल्पना पण अव्यवहार्य होती . दोन तीन क्षण गेले मला अस जाणवलं कि ते माझेकडे रोखून बघत आहेत . मी चमकून इकडे तिकडे पाहिले तर सगळ्यांनी बोट वर केलं होत . मी थोड बावचळून हळूच बोट वर केलं . नंतर आठवडाभर डिपार्टमेंट मध्ये त्या कल्पनेसाठी कागद जमवण चालू होत. 

 पुढच्या मिटिंग पासुन मला माझ्या सहकाऱ्यांनी मला शहाण केलं होत. त्यांनी काही सांगितल कि लगेच हात वर करायचा नाहीतर सरांना राग येतो . पण या अव्यवहार्य कल्पना राबवताना स्टाफची किती दमछाक होते याची कुणाला  काही घेण देन नव्हत .आणि त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही कल्पना पूर्ण पण झालेल्या मला पाहायला मिळाल्या नाहीत  .

त्यानंतर हा प्रकार थोड्याफार बदलाने  जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पाहिला.

**********************************************************************************

आज जे शिक्षण क्षेत्रात सगळीकडे जे प्रयोग चालले आहेत ते पाहिलं तर अशी भीती वाटते कि हे प्रयोग करणारे विचार करतात का ?  त्यापेक्षा वाईट म्हणजे कुठलाही विचार  करता अहो रूपम , अहो ध्वनी म्हणून विचार न करता लगेच त्या प्रयोगाला डोक्यावर घेणारी जी जमात आहे, त्यांना हे कळत का कि याचे परिणाम पुढ त्यांच्याच पिढीला भोगायला लागणार आहे . 

मानव ज्यावेळी पृथ्वीवर अस्तित्वात आला त्यावेळेपासून आजच्या या अवस्थेला यायला लाखो वर्षे लागली . हळूहळू मानवाचा  मेंदू  वेगवेगळ्या अनुभवला तोंड देत उत्क्रांत होत गेला . एक एक ज्ञानशाखा सुरु व्हायला अगदी अलीकडच्या दहा हजार वर्षापासून सुरुवात झाली . कला , वाणिज्य , विज्ञान आणि अगदी अलीकडे अस्तित्वात आलेल्या तंत्राशाखा .

 हे जर पाहिलं निर्माण होणाऱ्या  तर ज्ञान आणि   माहितीचा वेग हा  अगदी घातांकीय वेगात वाढत चालला आहे . प्रत्येक क्षेत्रात होणारी  अवाढव्य  प्रगती पाहिली तर त्यामानाने माणसाच्या मेंदूमध्ये होणारी वाढ आणि मेंदूचा होणारा विकास हा  अगदी नगण्य आहे. 

मेंदू आणि मेंदूच्या विकासाचा वेग ध्यानात न घेता निव्वळ फार्स करून पैसा कमवायची  प्रथा सुरु झाली आहे . २०१० पासुन जर तुम्ही पाहिले तर मुलांच्या बुद्धीमतेचा जर अंदाज घेतला तर त्यामध्ये वाढ होण्याऐवजी कमतरता निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे . याला कारण कि ज्ञानात निर्माण होणारी विविधता आणि त्याचबरोबर मेंदूची वेगवेगळ्या कार्यामध्ये होणारी विभागणी वाढत आहे . त्यामुळे प्रत्येक विषयावर होणाऱ्या विचाराची खोली कमी होत चालली आहे.  आजचे विद्यार्थी जरी तंत्रज्ञान हाताळणे यामध्ये कुशल असली तरी त्यांच्या बुद्धीच्या  किंवा मेंदूच्या  वाढीत काहीही बदल झालेला नाही.तसेच निरीक्षण , चिंतन  अनुभवाच्या आधारे अनुकरण आणि शेवटी अवलंबन या ज्या  शिकण्याच्या पायऱ्या आहेत त्यामध्येही अजुन बदल झालेला नाही . 

मुलांच्या मध्ये संशोधकता , विचार करण्याची प्रवृत्ती वाढवायची असेल तर त्यांच्या मेंदूला विचार करायला पुरेसा वेळ दिला पाहिजे . त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी अभ्यासक्रमात जागा ठेवल्या पाहिजेत पण या ऐवजी  त्यांच्या  अभ्यासक्रमात अकारण वाढत जाणारे  विषय , मेजरच्या बरोबर डोंबलावर पडणारे मायनर चे अधिकचे विषय ,  निष्कारण वाढवलेले प्रोजेक्टचे ओझे , वेगवेगळे बनवायचे  रिपोर्ट , वेगवेगळी  क्रेडीट  याखाली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता    घुसमटून जात आहे.  काही विषय असे आहेत कि त्यांची पूर्वतयारी करायसाठी लागणारे विषय हे एक तर अभ्यासक्रमात नाहीत किंवा तो विषय नंतर घेतला जातो . विषयाची गुंफण चुकत चालली आहे आणि इतर अनेक गोष्टींचा विद्यार्थ्यावर होणारा भडीमार वाढत चालला आहे . 

आपले विद्यार्थी, त्यांची आर्थिक , सामाजिक परिस्थिती . आपल्याकडे गेल्या शंभर वर्षापासून आलेली शिक्षण पद्धती याचा विचार न करता कुठल्यातरी पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा अचानक करत असलेला अवलंब . क्रांतिकारक बदलाच्या नावाखाली  शिक्षणात होत जाणारे बदल हे देशातील शिक्षण हळूहळू  संपवून  टाकेलं काय अशी मला भीती वाटत  आहे .  अर्थात शिक्षण हे कधी संपत नाही पण काही काळाने मागे अवश्य ढकलले जाऊ शकते .

मानवाचे जन्मापासून त्याच्या मेंदूमध्ये होणारे बदल याच्या वेगामध्ये बदल झालेला नाही .पण हे सगळ लक्षात न घेता आज जे शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करण्याचा घाट घातला आहेत त्याला पाहिले तर अस वाटत कि  मानवाच्या उत्क्रांतीच्या वेगाशी चाललेली शिक्षण क्षेत्राची स्पर्धा देशाला कुठ घेऊन जाणार ?


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६० 






Sunday, September 24, 2023

!!!!!!! ५५५ आणि व्होल्टेज मल्टीप्लायर !!!!!

 २००२ सालची  गोष्ट आहे . त्यावेळी  मी  साताऱ्यात स्वतःचा व्यवसाय सुरु केला . पार्टनरशिपमध्ये होता .  मी व्यवसाय का करत गेलो तर मला त्यावेळी पुण्यासारख्या ठिकाणी येउन राहायला आणि नोकरी शोधायला पैसे जवळ नव्हते आणि व्यवसाय सुरु करायला काय लागतय? . एक  मल्टीमीटर , सोल्डरिंग गन आणि दोन चार स्क्रू ड्रायव्हर  बस ...... अजुन काय?  हा , स्कील लागतंय त्याचा  काय  पहिल्यापासूनच महापूर  आहे आपल्याकडे  . तर एव्हढ्या भांडवलावर (आणि थोड्बहुत पार्टनरचे अर्थात पैसे . तेपण सांगितलं तर हसाल  त्याविषयी नंतर कधीतरी). तर मी साताऱ्यात व्यवसाय सुरु केला . देशमुख वस्तीमध्ये दोन रूम च्या घरात . 

त्यावेळी माझी आणि  बापूंची गाठ पडली  अर्थात हे बापू म्हणजे सगळीकडे दिसणारे बापू नव्हेत ,पण या बापूकडून मी बरंच शिकलो . माझ्या मित्राने त्यांची गाठ घालून दिली होती. साधा आय. टी. आय. माणुस (ते पण केलं होत कि नाही नक्की लक्षात नाही ). बापू म्हणजे हरहुन्नरी माणूस .त्यांच्याकडे एम. आय. डी. सी. मधील बऱ्याच इंडस्ट्रीच्या मोटर विषयी काम असायचं .  लहान आकाराच्या  मोटर पासुन मोठ्या मोटर   त्यांच्या तिथे खोलून बापूंच्या हस्त स्पर्शाची वाट बघत   इतस्तत: पडलेल्या असायच्या . मोटर रिवायडींग करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता .

 त्यावेळी सातारा एम आय डी सी मध्ये पावडर कोटिंगचा व्यवसाय अगदी बहरात आला होता . पावडर कोटिंग साठी आधी जॉबवर पावडर स्प्रे गनच्या सहाय्याने वेगवेगळ्या रंगाची  पावडर फवारली जायची .मग हि पावडर वितळून जॉबवर बसण्यासाठी त्या जॉबला एका भट्टीत घालायला लागायचं. हि भट्टी गरम करण्यासाठी  इलेक्ट्रिक हिटर असायचे .

त्यावेळी   एकतर  लोडशेडींगचा मोठा प्रॉब्लेम होता आणि त्यात विजेचे दर पण परवडायचे  नाहीत त्यामुळे बापूंनी गॅसचा पर्याय वापरून भट्टी बनवायला सुरुवात केली  होती . अर्थात त्यांनी नुसती सुरुवात केली होती त्यामुळे त्यांचे प्रयोग चालू होते . त्यांना इलेक्ट्रोनिक्ससाठी  माझी गरज होती . त्यामुळे त्यांनी मला लगेच सामील करून घेतले (अर्थात पैसे घंटा दिला नाही  पण  मी अनुभव भरपूर घेतला  ).

त्यांना गॅस डिटेक्ट करून , स्पार्क पाडून  भट्टी चालू करायची होती . आता सर्वसामान्य गॅस गीझर मध्ये जे वापरलं जात तेच तंत्रज्ञान आम्हाला वापरायच होत . त्यावेळी माहिती आणि पार्टस या दोन्हीची उपलब्धता नसायची . शेवटी मी ते सर्किट ८०५१ वापरून तयार केलं .  एल .सी. डी. वापरून त्यावर वेगवेगळे मेसेज यायचे . पण हे तंत्रज्ञान खूपच महाग व्हायचं . मला तर मायक्रो कंट्रोलर शिवाय ऑटोमेशन हि कल्पनाच करता यायची नाही. खुप विचार केला आणि शेवटी ते तंत्रज्ञान ५५५ आय. सी .वापरून अगदी स्वस्तात तयार झाल . अगदी मायक्रो कंट्रोलर वापरून जेव्हढा खर्च आला असता अगदी त्याच्या दोन टक्केपेक्षापण कमी खर्च आला .  यातून एक धडा घेतला कि प्रत्येक ठिकाणी मायक्रो कंट्रोलर गरजेचा नसतो .

बापू भट्टी बनवायला यशस्वी झाले आता प्रश्न उरला होता पावडर स्प्रे गनचा. पावडर स्प्रे गनमध्ये  जवळ जवळ ३०,००० ते ५०,०००  व्होल्टेज  गरज असते .  इतक व्होल्टेज म्हणजे मला सुरुवातीला भीती वाटली . पण यामध्ये करंट अगदी कमी असतो अगदी मायक्रो अम्पियर मध्ये त्यामुळे झटका लागत नाही .  इतक व्होल्टेज करायचं कस करायचं ? मग परत प्रयोग सुरु झाले . काही गन आणल्या होत्या त्याना खोलून पाहिलं पण आत सगळ्या सर्किटवर एम सील तर असायचं किंवा सगळ सर्किट काळ्याकुट अशा रंगान माखलेलं असायचं त्यामुळे ट्रेसिंग करायचं कस ... खुप विचार करत बसायचो . अर्थात माझ डोक इतकं चालायचं नाही . बापूंनी आयडिया सांगायची आणि मी त्यावर काम करायचं असा आमच्या कामाचा पॅटर्ण .  त्यांच्या भाषेत धु म्हटलं कि धुवायच विचारात बसायचं नाही .

नियम पाळायला मी इथच शिकलो .


तर एका वेबसाईटवर  आम्हाला थोडीफार आयडीया मिळाली कि हाय व्होल्टेज कसं तयार  करायचं . एक छोटासा  ऑस्सीलेटरच्या सहाय्याने हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार करायचा तो सिग्नल स्टेप अप करायचा आणि मग व्होल्टेज मल्टीप्लायरच्या  सहाय्याने ते व्होल्टेज  अजुन वाढवायचे . मग काय परत बेसिक इलेक्ट्रोनिक्स कामी आले . मग ५५५ चा वापर करून  हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार केला . मग ते व्होल्टेज स्टेप अप करण्यासाठी टू व्हीलर गाडीतील  इग्निशन सर्किटमधील  स्टेप अप ट्रान्सफोर्मर  वापरला. मग  डायोड आणि कॅपसितर वापरून तयार केलेला  व्होल्टेज  मल्टीप्लायर वापरून आम्ही पाहिलं सर्किट बनवलं . त्यात व्होल्टेज म्हणावा तसं वाढत नव्हत .

 मग काय करायचा मग दुसरा प्रयोग .. त्यासाठी टी व्ही मधील इ. एच. टी. चा वापर . हा बऱ्यापैकी यशस्वी झाला. त्यावेळची गंमत म्हणजे सगळ सर्किट बनल,  पण आम्ही अजूनही कलर टी व्ही च अखंड सर्किट वापरत होतो . अर्थात सर्किट मधील फक्त  इ एच टी हाच उपयोगात यायचा . त्यावेळी बापुना मी म्हणालो आता आपण एक वेगळ सर्किट बनवूया . पण बापू म्हणाले कशाला वेगळ सर्किट बनवायचं? आहे  हेच छान आहे . आपल्याला रेडीमेड टीव्हीच सर्किट मिळत तेच वापरायच . कस्टमरला पण अस मोठ सर्किट बघितल्यावर पैसे द्यायला बर वाटत. आणि दुसरा कोणी कॉपी करायला गेला कि कन्फ्युज होउन गेला पाहिजे .

आम्ही परीक्षेला ५५५ आणि व्होल्टेज मल्टीप्लायर यावर उत्तर लिहून मार्क्स  मिळवले पण त्याचा वापर कुठे करतात हेच शिकवलं नाही . आज डास मारायच्या मच्छरच्या बॅट, गॅस लायटर अशा बऱ्याच गोष्टीमध्ये या व्होल्टेज मल्तीप्लायरचा वापर केला जातो ... तुम्ही सागू शकाल काय ? अजुन काही उदाहरणे.


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in


Tuesday, September 19, 2023

^^^^^ Out of Box Thinking ^^^^ -मेकॅनिकल इंजिनियरिंगची हाराकिरी

 1999-2000 सालचा काळ होता . त्यावेळी मी तिसऱ्या वर्षाला नापास झालो त्यावेळी मी तडक साताऱ्याला गेलो आणि तिथे MIDC 

मध्ये  जॉब पकडला . हे एक वर्ष जे नापास झालेमुळे वाया जाणार होत त्याच एका वर्षाला मी  माझ्या आयुष्याचा पाया बनवलं . 

मेकॅनिकल, इलेक्त्रीकल  आणि एरो नोटीकल या शाखांशी मैत्र त्यावेळेसच जुळले.

त्यावेळेस आठवड्यातून एकदा कल्याणीच्या फॅब्रीकेशन शॉपला प्रीव्हेटिव मेंटेनन्ससाठी जायला लागायचं . प्रीव्हेटिव मेंटेनन्स म्हणजे 

 आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी सर्व मशीनची इलेक्ट्रिक कनेक्शन चेक करायची . सगळे कॉट्रक्तर उघडून त्याच्या पट्ट्यावरच्या  

कॉन्टक्ववरचा कार्बन घासायचा . त्यामुळे इलेक्ट्रिक सर्किट शिकलो .  त्यावेळी पहिल्यांदाच अवाढव्य अशा लेथ मशीनी पाहिल्या . 

दहामिटर लांब आणि जवळजवळ दोन मीटरचा  चक असणाऱ्या लेथ मशीनवर एखादा जॉब महिनाभर ज्यावेळेस केवळ पोलिश पेपरच्या

 सहाय्याने गुळगुळीत करण्यासाठी तीन तीन  शिफ्ट  फिरत असायचा त्यावेळेसच मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या  अवाढव्यतेचा अंदाज आला होता . 

अवाढव्य  अशा होरीझन्तल बोअरिंग मशीन , व्हर्टीकल टरेट लेथ , मिलिंग मशीन , कित्येक टनाचे जॉब उचलणाऱ्या राक्षशी क्रेन यावर

 बसून कंट्रोल पॅनेल मधील   वायरिंगच्या जंजाळात काम करताना मन इतक तल्लीन व्हायचं कि  अगदी तहान भूक हरवून जायचं .  अशा 

अनेक मशिनरी तिथ पाहिल्या . 

 पण मला एका मशीनच जास्त आकर्षण होत ते म्हणजे शेप कटिंग मशीन . एकदा पाहिजे असलेल्या आकाराच 

स्कॅनिंग करून त्याच  आकाराचे तीन तीन इंच जाड अशा लोखंडी शीट मधून तुकडे कापून काढणारी ती मशीन म्हणजे माझ्यासाठी एक 

आश्चर्य होती.  सगळ्यात  मोठ आश्चर्य म्हणजे ती मशीनचे कंट्रोल करणारा  मुख्य प्रोसेसर  ८०८५ हा होता. ८०८५ वापरून आपण काय  

मिरॅकल बनवु शकतो याचा मला अंदाज त्यावेळेस आला . एकदा  ते मशीन रिपेअर करण्याचा योग आला होता त्यावेळी जवळजवळ

 दोन महिने खपून अखंड  सर्किट मी ट्रेस केलं होत . सात A2 आकाराच्या शीटवर पेन्सिल आणि पट्टी वापरून ते सर्किट काढलं होत .

कल्याणी बरोबरच  "के ग्रुप" च्या वेगवेगळ्या  मशीन शॉप मध्ये वेगवेगळ्या मशीनच्या रिपेरिंगचे काम करण्याचा मला योग आला 

होता. प्लास्टिक  मोल्डिंग , बॉटल मेकिंग , पी वी सी पाईप , इलेक्ट्रिक  वायर  , पावडर कोटिंग मशीन , डेअरी मशीन तयार करणाऱ्या 

वेगवेगळ्या   कंपन्यांबरोबर काम केलं . हायड्रोलिक  ,न्यूमॅटीक मशीनवर काम केलं यातील प्रत्येकाविषयी नंतर 

डिटेलमध्ये योग येईल तसं बोलुच .

सांगायचा उद्देश म्हणजे मेकॅनिकल इंडस्ट्रीचे मेकॅनिकल कंट्रोल , प्रोसेसर बेस्ड कंट्रोल , मायक्रो कंट्रोलर बेस्ड कंट्रोल, पी. आय. डी. 

कंट्रोल , पी. एल. सी. बेस्ड कंट्रोल, कॉम्प्यूटर बेस्ड कंट्रोल , HMI, स्काडा  बेस्ड कंट्रोल अस  एक मोठ स्थित्यंतर होताना मी डोळ्याने 

केवळ पाहिलं नाही तर प्रत्यक्षात अनुभवलं आहे .

***************************************************************************

२०१२ सालची गोष्ट आहे . कॉलेजमधील काही मेकॅनिकलची मुल माझेकडे आली होती .त्यांनी मला सांगितलं कि ते गाडी करत आहेत आणि त्यामध्ये त्यांना लावायला एक सर्किट पाहिजे होत आणी  त्या  संदर्भात त्यांना मार्गदर्शन पाहिजे होत . माझी उत्सुकता वाढली . मग मी त्यांचेबरोबर गेलो तर कॉलेजने त्याना जागा दिली होती त्यामध्ये पन्नासभर मुल वेगवेगळे काम करत होते ते पाहून मला खूपच छान वाटलं. मग मी मेकॅनिकल डिपार्टमेंटला जायला लागलो . बरेच स्टाफ मित्र बनले . त्यांचेबरोबर बोलल्यावर मला एक लक्ष्यात  आल कि बरीच मुले हि त्यांचे प्रोजेक्ट गाडी संबधीतच करत होते. मग सहज त्यांचे जुने रिपोर्ट चाळले  . सगळा भर ऑटोमोबाईलवरच होता . त्यावेळी मेकॅनिकलला मार्केट पण होत . पण या मुलाचं लक्ष्य हे ऑटोमोबाईलकडे होत . तस बघायला गेल तर केवळ ऑटोमोबाइलसाठी एक स्पेशल शाखा होती. हे  प्रोजेक्ट करायचं काम त्यांच होत पण या कामात सारे मेकॅनिकलचे विद्यार्थी गढले होते.  उरलेल्याना आय. टी. मध्ये जायचं होत . आणि माझ्या डोक्यात त्यावेळेसच मेकॅनिकल विषयी धोक्याची घंटा वाजली . माझे काही जुने लेख वाचले तर ज्यावेळी मेकॅनिकल भरात होत त्यावेळेसच मी लिहिलं होत कि आज इलेक्ट्रोनिक्स जात्यात असलं तरी मेकॅनिकल सुपात आहे .

********************************************************************************

मेकॅनिकल इंजिनियरिंगने आता थोड आत्म परीक्षण केलं पाहिजे . उद्योग क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे . अभ्यासक्रम बदलला पाहिजे. अभ्यासक्रम बदलने म्हणजे केवळ एखादा इलेक्ट्रोनिकक्सचा किवा प्रोग्रामिंगचा विषय टाकणे असा नसुन त्याची मेकॅनिकल विषयीच्या अभ्यासक्रमाविषयी योग्य सांगड घातली पाहिजे . कारण इथं शिक्षकालाच कळत नाही हा विषय काय उपयोगाचा आहे ते विद्यार्थ्याना काय सांगणार ( उदा . मेकॅक्ट्रोनिक्स ). आज मेकॅनिकल इंजिनियरिंग क्षेत्रात करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत पण त्यातील संधी शिक्षण क्षेत्राला दिसत नाही . जुनाट पद्धतीच्या अवाढव्य मशिनरी आता अस्तंगत व्हायला लागल्या आहेत आणि कमी उर्जेवर चालणाऱ्या, आकाराने लहान ,पोर्टेबल, वजनाने हलक्या अशा मशिनरीचे युग आले आहे . इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रोनिक्स  आणि प्रोग्रामिंगचा वापर  करून मशीन आता स्वयंचलित आणि बुद्धिमान होत चालल्या आहेत. त्यामुळे तसा विचार केला तर आपल्या देशामधीलच जवळजवळ ९० % मशीन्स या बदलायच्या स्थितीत आहेत . अत्याधुनिक मशिनरीचे घरटी प्रमाण वाढत चालल आहे त्यामुळे मेकॅनिकलला स्कोप तस बघायला गेल तर कम्प्युटरपेक्षा जास्त आहे. मेकॅनिकल उद्योगामध्येच देशामधील  बेकारी कमी करण्याच सामर्थ्य आहे . पण ऑटोमोबाईलचा केलेला अती उदोउदो आणि  आय. टी. नादात अभ्यासक्रमाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष्य  त्यामुळे  हि ब्रंच पण पराभूत मानसिकतेकडे  वळत  आहे . 


चित्तरंजन महाजन 

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in



 


Tuesday, September 12, 2023

@@@ Out of Box Thinking - मुलांना प्रोग्रम्मिंग का जमत नाही ? -- ( भाग -१)

 १९८९ साली जेव्हा नुकतेच संगणक बाजारात आले होते तेव्हा कोल्हापूरमध्ये कोहिनूर इन्स्टीट्युटमध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा पहिल्यांदा क्लास सुरु झाला होता. ज्यामध्ये फक्त "बेसिक"  नावाची प्रोग्रामिंगची भाषा शिकवली जायची पण  त्याची फी होती ५०० रु . त्यावेळी हि फी खूपच जास्त होती त्यामुळे शिकायला मिळाली नाही . पुढे डिप्लोमा शिकत असताना पहिल्या वर्षाला परत बेसिक प्रोग्रामिंग आले .नंतर दुसऱ्या वर्षी   "C" प्रोग्रामिंग आले . तिसऱ्या वर्षी आम्हाला विषय होता प्रिन्सिपल ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज  त्यामध्ये  "फोर्ट्रान" आणि "पास्कल" या लँग्वेज होत्या. परत डिग्री सेकंड एअरला "C" प्रोग्रामिंग आले . मला वाटते त्याप्रमाणे सेकंड एअर च्या दुसऱ्या सेमिस्टरला कि तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला   "C++" आले. परत फायनल इयरचा प्रोजेक्ट करत असताना "JAVA" चा थोडा संबंध आला . हे एव्हढ शिकलो पण याच्यामध्ये आमच ज्ञान एरिया ऑफ Trangal च्या पलीकडे कधी गेलच नाही . सगळा पेपर आणि प्रक्टिकल ची परीक्षा प्रोग्राम पाठ करूनच पास व्हायचो .  एकतर कॉम्प्युटर नवीनच आले होते .( सांगायची गम्मत म्हणजे त्यावेळी स्क्रीन सेव्हर आम्ही दहा दहा मिनिट बघत बसायचो , प्रोग्राम केलेला स्टोर कुठ होतो आणि तिथुन तो परत ओपन कसा करायचा हे ज्यान आम्हाला शिकवलं तो दोस्त शेवट पर्यंत त्याला आम्ही मास्टर समजायचो) खरी गोष्ट म्हणजे आमच्या शिक्षकांनाच ते येत नव्हत. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण तो शिकवताना आत्मविश्वास नसायचा  आणि हे शिकून काय करायचं हेच त्यांना सांगायला जमत नसायचं. ते पण पुस्तकातले प्रोग्राम घ्यायचे . त्यामूळ बी. इ. झाली तरी आमची प्रोग्रामिंग यथा तथाच होत.  पण असेम्ब्ली प्रोग्रामिंग चांगल होत , खूपच चांगल. अक्षरशः ८०८५ ची पूर्ण ऑपकोड शीट पाठ होती. पण हाय लेव्हल लँग्वेजच्या बाबतीत बोंबच होती .

************

 पुढे  २००२ च्या आसपास साताऱ्यात "नॅनो टेक" या नावाने काम सुरु केलं होत. त्यावेळी मेसला जेवायला जात होतो . माझ्यापुढ जेवायला दोघ बसायचे . ते मटका खेळायचे आणि त्यांची चर्चा चालायची . मी एकदा सहज विचारला काय असतंय ते . ते म्हणाले हे लॉजिक असतंय . लॉजिक म्हटल्यावर माझा उत्साह वाढला मनात आल यात काय लॉजिक असतंय ते बघाव तरी . मग त्यांना माहिती विचारली मग काय त्यानापण मी चेला मिळालो . त्यांनी ओपन, क्लोज , चार्ट, कल्याण, मुंबई असं बरंच काही सांगितलं. आता मी प्रॅक्टिकल माणूस निव्वळ थेअरीन आपल्याला काय घंटा कळत नाही . मग काय प्रॅक्टिकल सुरु झालं. अगदी पन्नास पैसे पण खेळायला पुरायचे त्यामुळे रक्कम काही जास्त नव्हती . त्यांचेबरोबर नंबर लावायला सुरुवात केली . त्याचबरोबर त्यांनी एक चार्ट दिला आणि थोड काहीतरी सांगितलं . मग माझी सुरुवात झाली . तो चार्ट घेउन बसलो. काही कळत नव्हत . मग तो  सिक़्वेन्स शोधायचा ...... सुरुवातीला  ते आकडे बघूनतरही जांभया यायच्या  झोप यायला लागली . थोडा वेळ बघितलं कि छान झोप यायची . नन्तर नंतर   मळमळयला सुरुवात झाली ,  मध्येच आकडे लागायचे उत्साह वाढायचा परत नवीन हुरुपाने चार्ट घेउन बसायचो. नंतर डोकं दुखायला सुरुवात झाली . अक्षरश : डोक तापायला सुरुवात झाली .

आता तर सकाळी कल्याण , मुंबई आकडे लावायला सुरुवात केली होती .. ओपनचा  निकाल बघायला गेलो कि क्लोजचे आकडे लावूनच यायचो . अंदाज पण बरोबर यायला लागले . आणि एक दिवस डोक तापायच बंद झाल . डोक शांत झाल . आता चार्ट काहीही त्रास न होता बघता येत होता. बऱ्याच गोष्टी समजायला सुरुवात झाल्या . असाच महिना गेला . आता तर चार्टची चटकच लागली होती . आणि मनात घंटा वाजली कि हे काही बरोबर नाही . आपण हे कशासाठी केलं होत आणि आता काय करतोय . लगेच चार्ट जाळून टाकला आणि नंतर आजतागायत कधी या भानगडीत पडलो नाही.

*************

हे सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मी प्रोग्रामिंग शिकत होतो त्यावेळी माझ्या मनाची अवस्था आणि हे आकडे लावणे शिकत असतानाची अवस्था एकच होती . अर्थात कंट्रोल सिस्टीम मधला टाईम डोमेन रीस्पोंस पण हेच शिकवतो कि स्थिती बदलताना मन चार फेज मधून जात . विरोध , राग , वाटाघाटी आणि शेवटी स्वीकार . मग याचा परत अभ्यास करत राहिलो. त्यावर प्रयोग करत राहिलो  आणि मग त्यावर बनली  आमची डॉल्फिन लॅब्सची ट्रेनिंग पद्धती . विद्यार्थ्याना शिकवत असताना तुम्हाला विद्यार्थ्यांना या चार फेजमधून घालवता आलं पाहिजे . 

एक आमच निरीक्षण आहे कि कधीही आम्ही ट्रेनिंग देत असताना एखादा ग्रुप जास्त उत्साहाने प्रोग्रामिंग करत असतो आणि हा ग्रुप बऱ्याचवेळा उनाड पोरांचा असतो . आणि जो ग्रुप मागे असतो तो त्यामध्ये टॉपर असतात . आता हे अस कस अस त्यांना शिकवणारे शिक्षकपण विचार करतात . 

आता याच्यामागे पण एक कारण आहे ..... त्याविषयी नंतर बोलुच.


चितरंजन महाजन

९७६३७१४८६० 

 www.dolphinlabs.in

Sunday, September 10, 2023

 %%% Out of Box Thinking - उदंड झाल्या लॅब्स   %%%

ऐहिक गोष्टी आणि ज्ञान यामधून प्रत्येकजण ऐहिक गोष्टीलाच महत्व देतो . ज्ञानाच महत्व हळूहळू कमी होत चालल आहे  ज्ञानाला किंमत किंमत कमी होत आहे . ज्यावस्तूची किंमत कमी होत जाते त्यामध्ये प्रगती कमी होत जाते आणि त्याचा लोप व्हायला सुरुवात होते . ज्ञानाचा लोप व्हायला लागला कि ऐहिक गोष्टीमधील प्रगती कमी होत जाते आणि नंतर त्यांचाही लोप व्हायला लागतो.

आज काल मी बऱ्याच महाविद्यालयात जातो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे महावैद्यालायाने केलेली इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या लब्सॅमध्ये केलेली गुंतवणूक . कोविडचा एक महत्वाचा फायदा झाला कि त्यामुळे बरीचशी डबघाईला आलेले महाविद्यालय तारले गेले कारण दोन वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च कमी झाला . फी १००% ने गोळा झाली पण सर्वात मोठा शिक्षकावरचा पगाराचा भार कित्येक संस्थाचा ६०% ने कमी झाला . त्यातच बरेचजणानी शिक्षकी पेशाला रामराम ठोकला आणि ते उद्योग क्षेत्रात गेले . कमी पगारात काम करायला तयार असणाऱ्या शिक्षकांची भरती सुरु झाली .याचा फायदा म्हणजे खर्च कमी झाला त्यामुळे पैसे राहू लागले .

या पैशाचा उपयोग त्यांना चांगला स्टाफ भरणे , मुलांना चांगली ट्रेनिंग देणे या ऐवजी रंगरंगोटी मध्ये करायला सुरुवात झाली .  कुठ गेल कि प्रत्येकजण कौतुकाने लॅब्स दाखवतो . त्यामधल्या मशिनरीची किंमत ऐकली कि चक्कर येते .

  त्यांचा वापर किती आहे हे ऐकल कि आश्चर्याचा धक्का बसतो .याचा पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे  त्या मशिनरी कशा वापरायच्या याचीही माहिती त्यांना नसते. लाखो रुपयांची मशिनरी अक्षरशः एक शो पीस बनून राहिल्या आहेत . फक्त अडमिशनच्या वेळी त्यावरची धूळ झटकली जाते. पहिल्या वर्षी अॅडमिशन घेणाऱ्या मुलांना त्यांच्या पालकांना ते दाखवले जातात आणि त्यांचा वापर माहितीपत्रकावर फोटो छापण्यासाठी केला जातो . आणि त्यांच्या  किमतीचे आकडे  या लॅब्स्साठी किती खर्च केला आहे हे याचा मोठेपणा मिरवण्यासाठी होतो . ठिकाणी जुजबी प्रात्यक्षिक दाखवली जातात पण एकूण जे पैसे घातले आहेत त्यामानाने त्याचा उपयोग किती ?

मध्यंतरी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात गेलो होतो त्यांनी मला एक मशीन दाखविली पी.सी.बी . मिलिंग मशीन . त्याची किंमत जेव्हा ऐकली त्यावेळी फक्त चक्कर येण बाकी होते . मशीनची किंमत होती २७,००,०००/- अक्षरी  सत्तावीस लाख रुपये .आणि २०१८ मध्ये मशीन घेतली होती आणि  २०२२पर्यंत त्यावर बनवलेल्या पी सी बी ची संख्या होती  फक्त दोन.  म्हजे एका पी सी बी ची किंमत     जर २७,००,०००  गुंतवणुकीचे ६% ने एक वर्षाचे व्याज  (२७,००,०००  / १०० ) * ६ = १,६२,०००  . तीन वर्षाचे  व्याज १,६२ ,००० X 3 = ४,८६,०००   म्हणजेच एक पी सी बी पडला जवळ जवळ २,४३,००० ला . 

महाविद्यालायाना खरा म्हणजे हे पैशाच गणित कळल पाहिजे . आपण जे पैसे मोजतो  ती  गुंतवणूक आहे कि निव्वळ खर्च आहे याचा विचार केला पाहिजे . कित्येक ठिकाणी मोठमोठ्या लॅब्स दाखवतात .आजकाल रोबोटिक्स  , पी. सी. बी. लॅब्स , आय ओ टी, अशा  बऱ्याच स्टेट  ऑफ आर्ट (?) लॅब्सच  एक नवीन खूळ आल आहे अक्षरश:  करोडो रुपये त्यात घातले आहेत पण त्या वापरावाचून पडून आहेत आणि ज्याठिकाणी त्या वापरल्या जातात त्या ठिकाणी  त्या वापराचा आणि त्यावर केलेल्या गुंतवणुकीचा काहीही ताळमेळ बसत नाही . मोठ्या हौसेने बनवलेल्या या लॅब्स म्हणजे एक पांढरा हत्ती बनून राहिल्या आहेत .  निव्वळ एक शो पीस बनुन. 

बर यामध्ये एखाद्या शिक्षकाने आपला इंटरेस्ट दाखवावा तर सगळ त्याच्या गळ्यात पडत . या मशिनरी इतक्या महागड्या आहेत कि त्यावर काही करायचं म्हणजे समजा चुकल तर काय ? एखादा पार्टस खराब झाला तर काय करायचं हा देखील प्रश्न आहे . त्यामुळे मुलांना दाखवताना पण त्या लांबूनच दाखवल्या जातात . बर हे मशिनरी घेतल्यावर त्याच ट्रेनिंग घेतलेल्या स्टाफची पण कुवत सगळ समजूण घेण्याएव्हढी पाहिजे .त्यासाठी तसा स्टाफ नेमला पाहिजे . कुणातरी टेम्पररी नवीन स्टाफच्या गळ्यात ते ट्रेनिंग मारलं जात . तो स्टाफ पण नंतर सोडून जातो . आता परत परत नवीन स्टाफना ट्रेनिंग द्यायला ते वेन्डोर पण इतके वैतागले आहेत कि आता तर ते प्रिन्सिपलचे फोन पण घेत नाहीत . 

आता याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावापरात आणायच्या म्हणजे थोडीफार परत गुंतवणूक करायला पाहिजे पण त्यासाठीही मानसिक तयारी नाही . त्यासाठी चांगला स्टाफ मिळत नाही कारण त्या स्टाफसाठी पैसे मोजायची तयारी नाही . आजकाल एन. बी. ए. , NAAC कमिटी मेंबर  जेव्हा याच युटीयझेशन काय ? अस विचारता तेव्हा त्यावेळी त्याची माहिती मोठ्या कौतुकाने सांगणाऱ्याला धरणी पोटात घेतली तर बर होईल अस वाटत  .  

मशिनर मध्ये फालतू पैसे घालवण्या ऐवजी मुलांना चांगल ट्रेनिंग देवून त्यांच्या माध्यमातून कमी पैशात चांगली मोठी लॅब्स बनविणे अतिशय सोपे आहे पण त्यासाठी पैसे घालणे हे पैशाचा अपव्यय वाटतो . या सगळ्याचा परिणाम म्हणजे ट्रेनिंगसाठी पैसे नाहीत . त्यामुळे मुलांना ट्रेनिंग नाही .त्यामुळे लॅब्सचा वापर नाही. आता या पांढऱ्या हत्तीच काय करायचं हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी आहे .


 चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६० 

Tuesday, September 5, 2023

### OUT Box Thinking ---- शिक्षण क्षेत्रापुढील नवीन आव्हान ###

 डॉल्फिन लॅब्स   माध्यमातून काम करताना आमचा अगदी चौथीपासून ते पार पी. एच डी पर्यंतच्या विद्यार्थ्यानशी संबध येतो . एव्हढ्या मोठ्या शिक्षण पटावर अभ्यास  करणारे दुसरे कोणी भारतात नसेल .  हा  अभ्यास करताना  महत्वाची आणि नवीन गोष्ट लक्षात आली आणि तिच्याकडे शिक्षण संशोधकाच अभ्यासासाठी लक्ष गेलेले नाही . 

आमच्याकडे काही पालक त्यांच्या मुलांना घेउन यायचे आणि तक्रार करायचे कि हा अभ्यास करत नाही . शांत नाही ,अतिशय चंचल आहे . याच अभ्यासात लक्ष्य नाही पण याला इलेक्ट्रोनिक्समध्ये खुपच लक्ष आहे . सारख  बॅटरी, वायर सारख्या गोष्टीमध्ये रमत असतो. घरातील वस्तू खोलत असतो .  

अशा विद्यार्थ्यांचे निरीक्षण करत असताना एक  गोष्ट जाणवली कि या मुलांची चेहरेपट्टी हि उलट्या  त्रिकोणी असते . कदाचित या गोष्टीचा उल्लेख माझ्या याआधीच्या लेखातही ओझरता केला असेल . यांची हनुवटी हि निमुळती असते.  या हनुवटीच्या आकारावर पण बऱ्याच गोष्टी समजत  असतात . अशा जवळजवळ प्रत्यक्ष  शंभरच्या वर  विद्यार्थ्यावर काम केलं  आणि अप्रत्यक्षपणे भरपूर  मुलांचा अभ्यास झाला आहे . 

माझ्या संपर्कात आलेले  अमय महाजन ,  तलहा शेख ,मोएझ पठाण , आयुष जाधव , सोहम मंत्री , किशन घाटोळे, शुभम वानखेडे , शुभम ठोंबरे अशी बरीच नावे घेता येतील . बरीच लिस्ट मोठी आहे पण हि मोजकी नावे ज्यांच्याशी माझ्या फेसबुकवरील मित्रांचा कधी ना कधी संबंध आलेला आहे . यातले काही जण नापास होते, काही जणांना अभ्यासात  मार्क्स चांगले नसायचे . पण आज यातले व्यवस्थित मार्गावर आहेत. काही परदेशात आहेत आणि काहींचा स्वतःचा उद्योग पण आहे .

हा तर सांगायची गोष्ट म्हणजे हि त्रिकोणी डोक्याची मुल पहिली खूपच कमी दिसायची पण अलीकडे ज्यावेळी मी वेगवेगळ्या शाळांना भेट दिसतो त्यावेळी यांची संख्या वाढत चाललेली आहे . हि एका बाजून चांगली आहे पण दुसऱ्याबाजूने विचार करता हे चिन्ह पण चांगल नाही कारण शिक्षण  क्षेत्रात हि मुलाना समजून घेण्यासाठी काही पद्धती अजुन विकसीत नाही. कारण आजपर्यंत तुम्ही जर विचार केला तर या मुलांच्यावर शिक्षण क्षेत्राने अन्यायच केला आहे . जुन्या काळात हि मुल जास्त शिकायची नाहीत .   ठराविक चौकटीत बांधून ठेवणाऱ्या शिक्षण पद्धतीशी जमायचं नाही , मध्येच शाळा सोडायची . 

हि मूल खूपच चंचल आणि धरसोड करणारी असतात . त्यांचे लहानपणापासून बुद्धीचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे झाले असेल त्यांच्यात एक ठामपणा पण दिसतो पण हे खूपच कमी निरीक्षणास आले आहे . आतापर्यंत जो अभ्यास सांगतो कि मुलांचा लक्ष्य देण्याचा टाइम स्पॅन हा १२.५  मिनिटाचा असातो तर या मुलांच्या बाबतीत तो तीन मिनिटापेक्षा पण कमी असतो.आणि आता मोबाईलच्या मुले हा अजुन कमी आला आहे . तर अशा मुलांच्या बाबतीत काय करायला पाहिजे याचा आता विचार करायला पाहिजे . कारण आता हि मुले बहुसंख्य आहेत  आणि यांची संख्या पण वाढत चालेलेली आहे .

याच्यावरही लिहिण्यासारखे खूपच आहे  आणि पुढे वेळ मिळेल तसा यावर लिहीतच जाईन. सध्या तुम्ही आसपासच्या या प्रकारच्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करा ... काही अनुभव असेल तर अवश्य शेअर करा.


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

 

Sunday, September 3, 2023

Out of Box Thinking- इलेक्ट्रॉनिकस इंजिनिरिंग- अस्तित्व गमावत चाललेली ब्रँच

यावर्षी बारावीचा निकाल चांगला लावल्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला परत भरती आली . त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या जागा पण भरल्या .अर्थात यामागचं कारण वेगळं आहे .एक तर बऱ्याच महाविद्यालयानी इलेक्ट्रॉनिक्स शाखा बंद केल्या आहेत, काही ठिकाणी इंटेक कमी केला आहेआणि कंप्यूटरला प्रवेश मिळाला नाही म्हणुन नाईलाजाने या ब्रॅंचला ऍडमिशन घेतलं आहे. त्यात पण एक चांगली आणि एक आशावादी गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक्सला  स्वतः हुन मनापासुन ऍडमिशन घेणाराची संख्या दोन चार टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळं यावर्षी इलेक्ट्रॉनिकची कळी  खुलली आहे. पण खरंच आमचं शिक्षण क्षेत्र त्यांना न्याय देण्यास सक्षम आहे का? याच उत्तर कुणीही कितीही ठामपणे होय म्हणून सांगितले तरी ते सत्य हे नसणार आहे. कारण ही शाखा सध्याच्या संधीला आणि आव्हानाला सामोरे जाण्यास अजिबात सक्षम नाही.

तुम्हाला ढोबळपणे सांगतो. 1990 - 91 ला  इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाणे कात टाकायला सुरुवात केली आणि अभ्यासक्रमातून व्हॅक्युम ट्यूब पूर्णपणे काढून टाकून ट्रान्झिस्टरवर  जास्त भर द्यायला सुरुवात केली.1998-2000 सालापासून मायक्रोकंट्रोलर फार्मात आला . 2005 पासून VLSI ला मार्केट आले आणि त्यानंतर 20०८ पासून ३२ बीट मायक्रोकंट्रोलर आणि RTOS अभ्यासक्रमात आले.

अर्थात हे यायला तसा उशीरच झाला . 2010 च्या आसपासून चित्र पालटायला सुरूवात झाली.महाविद्यालये वाढली. मुलांची गुणवत्ता कमी झाली..स्टाफची गुणवत्ता पण कमी झाली कारण महाविद्यालयांची संख्या वाढू लागली तसं स्टाफपण अपुरा पडू लागला . त्यातच उद्योगक्षेत्रातील संधी वाढत असल्यामुळे चांगली मुले प्लेस होऊ लागली होती . त्यामुळे  मिळतील  तसे स्टाफ भरले. कुठल्या स्टाफची क्षमता काय याचा विचारच केला नाही .

तशातच आठवीपर्यंत नापास नकरता धकलगाडीत बसवलेले विद्यार्थी पण आले.आता या विद्यार्थ्याचा निकाल चांगला लागावा म्हणून अभ्यासक्रमातील काठीण्य कमी करायला सुरुवात झाली .  जे इम्बेडेड सिस्टीम ज्यावर  आजचे पूर्ठीण इलेक्ट्रोनिक्स क्षेत्र अवलंबून आहे आणि आज जे  नोकरी मिळवण्यासाठी अतिशय  गरजेच असते त्याच्या मुळावरच घाव घालायला सुरुवात झाली .  C प्रोग्रामिंगवरच कुऱ्हाड चालवली. त्याच्यातील  पोइंटर , फाईल handling काढून टाकले . पुढे ८०५१  असेम्ब्ली प्रोगामिंग काढले , त्यातच PIC घुसडला .( PIC शिकणे पण गरजेच आहे पण त्याला वेगळा विषय बनवायला पाहिजे होता) . त्यामुळे  मायक्रोकांत्रोलरचा अभ्यासावर मर्यादा आली .  इंटर फेसिंग , प्रोग्रम्मिंग कमी केले . ३२ बीट आर्म  कंट्रोलर कसा शिकवायला पाहिजे यातच अक्षरशः पाच वर्षे बरबाद झाली ( हि एक वेगळीच गंमत आहे कारण मायाक्रोप्रोसेअर  कोअर आणि त्यावर डिझाईन केलेला मायाक्रोकांत्रोलर यातला फरकच अभ्यासक्रम करताना करणाऱ्याला कळला नाही  त्यामुळे शिकवलं एक आणि प्रोग्रामिंगसाठी लागणार ज्ञान मिळालाच नाही ).  

हळूहळू अभ्यासक्रमातील जो नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असा पार्ट काढला. आता तर VLSI एफ पी जी  ए प्रोगामिंगचे किट्स नाहीत  आणि RTOS शिकवायचा बंदच झाला आहे . नवीन किट्स घेण्याऐवजी सिमुलेटरवर  शिकवायला सुरुवात झाली आहे ज्याची  मजा मुलांना येत नाही . सध्या जो अभ्यास  इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी महत्वाचा आहे एकतर   तो सगळा काढून टाकला आहे किंवा त्याचे महत्व कमी केलं आहे .

आणखी एक बदल इथे सांगितला पाहिजे . सर्वसाधारणपणे १९७० च्या पूर्वी  इलेक्ट्रोनिक्सचे तंत्रज्ञान हे DC ४८V वर चालणारे होते . ८०-९० मध्ये ते २४ V वर आले , ९०-२००० च्या सुमारास 12V , २०००-२०१० पर्यंत 5V वर आले आणि २०१० पासुन २० पर्यंत 3.३V आले आणि आतातर ते १.८ Vवर हळूहळू शिफ्ट होत आहे . 

२०१० पासूनच बाजारातून ट्रान्सफोर्मर बेस्ड पॉवर सप्लाय दिसायचे बंद झाले आपण अजूनही अभ्यासक्रमात बराचसा भाग त्यावर वाया घालवत आहे .

सध्याच्या क्षेत्रासाठी कुठले विषय पाहिजेत तेच अभ्यासक्रम तयार करणाऱ्याना  ठरवता येत नाही . किट्स विकणारी टोळी जो अभ्यासक्रम बनवतात तो तोच विद्यार्थ्यांच्या कपाळी  मारला जात आहे . शिक्षकांची नवीन काही शिकण्याची मानसिकता नाही . काही स्वायत्त झालेल्या विद्यापीठात तर नवीन अभ्यासक्रम करताना केवळ  सिनियर स्टाफने  आजतागायत इतकी इतकी वर्षे त्या एकाच विषयाची पाटी टाकली म्हणून गरज नसताना सुद्धा तेच विषय ठेवले आहेत .

 इलेक्ट्रोनिक्सचे विषय कमी करून  जावा , पायथोन , जावा आणल जाऊ  लागल आहे  .  आणायला काहीही हरकत नाही पण त्याचा इलेक्ट्रोनिक्ससाठी पूरक असा वापर करण्या ऐवजी त्यांचा काही संबंधच दाखवला जात नाही .

आज तस पाहायला गेलो तर इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग जवळजवळ २० वर्ष मागे गेल आहे . त्यात आता इलेक्ट्रोनिक्सच  कम्प्युटर , मेकॅनिकल बरोबर कॉकटेल करायचं नवीन फॅड सुरु झालय (याच्याबद्दल लिहीनच ).

 ....एक मात्र खर  हळूहळू   इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग अस्तित्व  गमवत चालली आहे . आज जगात इलेक्ट्रोनिक्चास उदो उदो होत असताना सुद्धा या ब्रंचला स्वतःचा चांगला अभ्यासक्रम बनवता  येत नाही आणि  .शिकवताही हिच शोकांतिका  आहे .  

Friday, September 1, 2023

**** Out of Box Thinking - अजुन थोड आणि बरंच काही *****

आता पर्यंत मी डॉल्फिन लॅब्सच्या माध्यमातून कार्य करत असताना अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रावर बरेच संशोधन केले . त्यामुळे माझ्याकडे लिहिण्यासारखे आणि करण्यासारखे खूपच आहे . त्यामुळे दररोज जरी लिहित बसलो तरी पुढची चार पाच वर्षे तरी संपणार नाही .खर म्हणजे आता  लिहिण्यातही अर्थ  वाटत नाही कारण आता हे क्षेत्र खूपच पुढ गेल आहे आणि जवळजवळ संपलंच आहे . आता तुम्ही मान्य करत नाही कारण तेह्वढी मानसिकता पण उरली नाही . कारण जर असती तर सुधारणा करायला मागेच सुरुवात झाली असती . 

आता हेच बघाना पोरग शिकत एलेक्त्रीकल , मेकॅनिकल , इलेक्ट्रोनिक्स ,सिव्हील आणि प्लेस होत कॉम्पुटरच्या पोराबरोबर आय .टी .मध्ये म्हणजे इतके पैसे घालून, परीक्षा देवून डिग्री घेतली तिचा फायदा काय ? त्या ज्ञानाच काय करायचं अर्थात ते चार वर्षात किती मिळवलं हा प्रश्न आहेच . आणि सगळ्यात केविलवाणी अवस्था म्हणजे कॉम्पुटरची .अस काय वेगळी ब्रंच घेउन झेंडे लावले जर इतर मुलांच्याबरोबर प्लेस व्हायचे होत तर? . बर हे सगळ करून परत कंपनीत घ्यायचं ट्रेनिंग ते वेगळंच  .

हे म्हणजे  अस झालय कि दवाखान्यात पेशंटन जायचं  कारण  डॉक्टर जगायला पाहिजे, डॉक्टरने दिलेली औषधे घ्यायची कारण केमिस्ट जगला पाहिजे आणि आणलेली औषधे कचऱ्यात टाकायची कारण स्वत : पण जगल पाहिजे . 

सगळा इस्कोट झालाय कुणाला कशाचा ताळमेळ नाही . आपल्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला मुलांना आय. टी. ला घालवायची इतकी घाई झाली आहे कि त्याना प्लेसमेंटला  एन्ट्री मिळवायला लागणारी मार्क्स दिली कि आपली जबाबदारी संपली अस वाटत . मग काय कशीही मार्क्स फुगवा ..... त्यामुळे Out of Box Thinking ला कुणाला वेळच नाही आणि ते जमायला पण पाहिजे .

मला कधीकधी आश्चर्य वाटत कि चायनाची प्रोडक्ट्स तुम्ही बघा इतके वेगवेगळे व्हरायटी मिळतील . परवा तर वेणी घालण्याच सुद्धा मशीन त्यावर पाहिले . किती प्रोडक्ट्स ते बनवतात . डोक्यात कधीकधी विचार येतात कि काय चालाल काय आहे आपल्याकडे. 

इतकी सोपी प्रोडक्ट करायचं आपल्याला कस सुचत नाही तर याला कारण आहे आम्ही आमच्या मुलाचं बौद्धिक खच्चीकरण चालवल आहे. याची सुरुवात खूपच आधीपासून होते .

आपल्याकडे मुलगा पाचवी सहावी पर्यंत जाऊपर्यंत पालक मुलांचे खूपच कौतुक करतात . त्याला प्रत्येक गोष्टीत विचार मांडण्याची संधी देतात, सातवीपर्यंत ऐकून घेतात आणि त्यानंतर बापच पोराला म्हणतो बापाला शिकवतो काय ? त्याबरोबर दहावीच भूत आठवीपासूनच मानेवर बसत  .. क्लासेस सुरु होतात . काही ठिकाणी तर आठवीपासूनच आय. आय. टी .कोचीगला घालतात . पोराची विचार शक्तीच कमी करून टाकतात . रट्टा मारायची सुरुवात होते. 

दहावी नंतर लगेच बारावी ... परत अभ्यासाची सुरुवात परत रट्टा... हि परीक्षा ती परीक्षा अस करून बौद्धिक गोटा झालेलं शेवटी ते  इच्छ्चेन, नाईलाजान अभियांत्रिकीच्या   प्रवाहात पडत . पहिल वर्ष सुरु होत. अर्थात आधीच महाविद्खुयालय चालू व्पहायला  उशीर झालेला असतो .. मग काय त्या बिचाऱ्याला उसंत सुद्धा मिळत नाही. पहिलं  वर्ष संपत. दुसऱ्या वर्षी ते त्याच्या शाखेत जात त्याला वाटत साल आता काहीतरी वेगळ घडेल पण तिथ वेगळीच तऱ्हा. 

डिपार्टमेंटला आलेवर त्याला शिस्त लागली पाहिजे म्हणून परत डिपार्टमेंटचा रट्टा . दुसऱ्या सेमला त्याला वाटत आतातरी दुनिया बदलेल पण नाही .तिसऱ्या वर्षाला त्याला शिंगे यायला सुरुवात होते आणि तिसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सेम पासुन पोरग मुर्दाड बनायला सुरुवात होतेआनी   Out of Box Thinking करण्यामधून बाहेर येत .... त्याला सगळी सिस्टीम समजलेली असते आणि कळून चुकते सगळ Xटू आहे .

त्यातूनच काही मुल क्लब करतात ,काही वेगळी वाट चोखाळतात पण त्यात त्यांना जागा देण आणि त्यांनी आणलेली पारितोषिक मिरवण यापलीकडे महाविद्यालय काहीही करत नाही . कारण सगळे पैसे मुलंच जमा करतात . अर्थात काही अपवाद आहेत पण फारच थोडे आहेत .

हि कागद जमा करण्याच्या नादात पोरांच्या मेंदूची रद्दी कधी होते हे ना पोराला कळत ...ना महाविद्यालयाला....आणि  Out of Box Thinking विषयीची FDP चालतच राहतात .....चालतच राहतात .

चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in


Thursday, August 31, 2023

 *** Out of Box Thinking  - कसं बनत  ***

आता विषयाला हात घातलाय म्हणून जे मनात विचार येतात ते मांडतो . 

१९९३ सालची गोष्ट . बारावी MCVC इलेक्ट्रोनिकला   होतो आणि डोक्यात आलं चला आपण काम्पुटर बनवूया . आता त्यावेळी काम्पुटरम्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. मग आता हे बनवतात कस  . मग काय मी आमच्या जे. पी . पाटील  सरांना विचारल . ते म्हणाले गावकरच मायक्रोप्रोसेसर वाच . मग लगेच सांगलीला जावून ताम्ह्नाकरांच्या तिथून ११० रुपयेला पुस्तक आनल. वाचायला सुरुवात केली घंटा काही कळत नव्हत .कितीतरी वेळा वाचायचो काहीच डोक्यात शिरायचं नाही . आमच्या सरांचं ज्ञान पण यथातथाच. पहिली पन्नास ते साठ पान सारखी वाचायचो . त्यापलीकडे काही गाडी काही जातच नव्हती . ते मायक्रोप्रोसेसर मधले रजिस्टर , इलेक्ट्रोनिक्स मधले रेजिस्तर आणि आपल्या दैनंदिन जीवनातले लिहायचे रजिस्टर कुठ मॅप होतच नव्हते . ते असेम्ब्ली प्रोग्रामिंग तर समजतच नव्हते . सर सांगायचे कि हे लाईन मूळ A मधलं B मध्ये जात .... अस बरंच काही सांगायचे . त्यांची पाठ मी सोडतच नसायचो . अगदी मी वेताळ कसा विक्रमाच्या बोकांडी बसतो तसा मी त्यांच्या मागे लागायचो  आणि वीस जणात मीच शिकायच्या इच्छेने आलो होतो त्यामुळे ते पण मला खूपच समजून घ्यायचे .   खुपच डोक्याची मंडई झाली होती . 

असाच एकदा दुपारी बसलो होतो आणि बहिणी खेळत होत्या . त्यांच्यामध्ये गाई गाई असा खेळ चालला होता . पाच पाच खड्डे काढले होते आणि त्यात खडे टाकत जायचं असं काहीतरी खेळ होता . बराच वेळ बघत होतो आणि अचानक डोक्यात उजेड पडला.  मी त्या खड्यांच्या जागी रेजिस्तर आणि खड्याच्या जागी आकडे दिसू लागले . आणि अचानक प्रोसेसरच बेसिकच कळून गेल . त्यानंतर असेम्ब्ली लँग्वेज , मायक्रोप्रोसेसर हे समजूनच गेले . मेंदूमध्ये त्यांचा एक सिमुलेटरच बनून गेला.

आज मायक्रोप्रोसेसर हा विषय सहावी सातवीच्या विद्यार्थ्याना शिकवता येण्यासारखा आहे पण त्या दिशेने प्रयत्न होतच नाही . आम्ही मागे एक प्रयोग केला होता आणि सहावी सातवीच्या मुलांना एफ पी जी ए प्रोग्रामिंग शिकवलं होत आणि कळून चुकल कि मायक्रोप्रोसेसर खूपच सोपा आहे .

आज जी साधने अभियांत्रिकी महाविद्यालयात आहे त्यांच्या सहाय्याने मायक्रोप्रोसेअर स्वत : कसा बनवावा हे आता अभ्यासक्रमात पाहिजे पण हे शिकवणारी पद्धती विकसित केली पाहिजे .

******

डिप्लोमा झाला आणि डिग्रीला अॅडमिशन घेतलं . सेकंड इयरचा M3 निघाला नाही आणि तोवर EME बोकांडीवर बसला. त्यावेळचा EME म्हणजे काय सांगायचं ? त्याची धडकीच बसायची . EMEचे पेपर म्हणजे कुंभमेळाच असायचा . पाचपाच वर्षे विषय न सुटलेली आमचे सिनियर त्यावेळी यायचे . EME म्हणजे काय सांगायचं . पहिल्या वेळी १३ मार्क , दुसऱ्यावेळी १४ मार्क . आता या गतीने जायचे म्हणजे म्हटल आता मी पण सुपर सिनियर होणार वाटत .  त्यातच एक वर्ष वाय. डी . झाल . तिसऱ्यावेळी कोलेजच्या गच्चीवर पुस्तक घेउन गेलो आणि सहज डूलका

 लागला आणि स्वप्नात ते सगळे इलेक्ट्रोन्स दिसायला लागले . आणि अचानक मला तो विषयच समजून गेला . मी त्यावेळी पेपरला बसलोच नाही म्हटलं अजुन अभ्यास केला पाहिजे . मग हळूहळू तो विषय समजत गेला आणि आता तो विषय पण चांगला कळायला लागला ( माझ आणि maths च अजूनही जमल नाही बरका.. ) आणि चौथ्यावेळी विषय निघाला ५२ मार्क पडले पण विषय मात्र चांगलाच कळला.


******


डिग्री तिसऱ्या वर्षी नापास झालो आणि त्याचवेळी बॉम्बे फ्लाईंग क्लबच्या कॅ. आनंद बोडस याच्या संपर्कात आलो .त्यांच मायक्रोलाईट विमान बघून त्याचे बोट धरून थोड विमानशास्त्रात पण भटकंती करून आलो . त्तेयांनी फ्लाईट डायनामिक्स शिकायचं सल्ला दिला . मग कर्मोडेच पुस्तक वाचायचला सांगितलं  . त्यातही समजायची अडचण . एकदा असच त्यांना भेटायला गेलो होतो  एक शंका विचारायला . ते म्हणाले बस इथं . तिथच जमिनीवर वाळूत  बसले  आणि खाली पडलेली एक काडी घेउन   म्हणायले आरे हे अवघड नाही हे एकदम सोप आहे . तुझ मन मोकळ सोड आणि लक्ष दे . मग वाळूत रेघोट्या मारून त्यांनी मला एरो डायनामिक्सचे धडे दिले आणि पाया पक्का केला . आज एखाद मॉडेल बनवायचं तर लगेच टेस्टिंगसाठी विंड टनेलचे गरज भासत नाही फक्त नजरेन हवेचा विरोध कुठ आणि कसा होईल याचा अंदाज येतो .तशी त्यांनी मला नवीन दृष्टी दिली ..  

******


आज ज्या पद्धतीने हे विषय शिकवले जातात ते पाहिलं तर वाईट वाटत . सिमुलेशन, विज्युलायझेशन , वर्च्युलायाझेशनचा इतका  भडीमार सुरु केला आहे कि आपण विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमताच गमावुन टाकत आहे. विद्यार्थ्याना out of box  विचार करण्याची प्रक्रियाच थांबवून टाकली जात आहे . नोकर घडविण्यासाठीचा अभ्यासक्रम बनवायची स्पर्धा सुरु झाली आहे आणि बुद्धीचे खच्चीकरण होत चाललं आहे ...

Out of Box Thinking शिकवायला शिक्षण क्षेत्रात  माणसे आहेत का ..............?

 





 **** out of box thinking- ते काय असत भाऊ ****

२००७ साली मी जेव्हा  शिक्षकी पेशात आलो होतो Out of Box thinking केलं पाहिजे अस  त्यावेळी कायम ऐकायचो.सुरुवातीला त्याच मला खूपच अप्रूप वाटायचं . जो तो व्याख्याता यायचा तो याच विषयावर बोलायचा . अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये सुगीचे दिवस आले होते . व अडमिशन सगळीकडे जोरात होती  सगळीकडे उत्साह होता . 

        त्यावेळी मिशन १०X नावाचं विप्रोने   सरकारला द्यायचा कर  वाचावण्यासाठी एक नवीन कार्यक्रम तयार केला होता . ते ट्रेनर सांगायचे शिक्षकाने नेहमी Out of Box thinking केलं पाहिजे . ऐकायला लय भारी वाटायचं .( मजा म्हणजे यातल्या कुठल्याही ट्रेनरला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचा अभ्यास नव्हता. ) कुठून कुठून वाचलेल्या पुस्तकातल्या पोपटासारख्या सांगायचं .Bloom taxonomy ,Three bucket , Quiz ,Roll play  अस बरच काही असायचं त्यात . 

खुप वेगळच वाटायचं . वाटायचं कि आपणही अस काहीतरी केलं पाहिजे .  उत्साहान  कार्यक्रम अटेंड करून आलो होतो. आमच्या एच ओ डी ना सांगितलं सर अस अस ऐकल आहे आपण पण हे चालू केलं पाहिजे . आमचे  एच ओ डी नी पहिलाच धडा दिला . ते म्हणाले हे बघा , हे कार्यक्रम आपल्याला फक्त ऐकायचे असतात . त्यातलं आपल्याला राबवत बसायला वेळ नसतो . तुम्ही तुमचा अभ्यासक्रम वेळेत संपवला पाहिजे. त्यांचही खर होत . हि असली नाटकं करायला वेळही नव्हता . पोरांच्या टेस्ट , टीचर गार्डियन , त्यांच्यासाठी क्वशचन बँक तयार करा . त्यांची उत्तरे काढा , पी पी टी बनावा ( त्यावेळी इंटरनेटवर एव्हढ मटेरियल सहज मिळायचं नाही ), पोरांच्यासाठी ओरल क्वश्चन बँक करा अस बरंच काय काय करायचं असत . त्यात या उचापती कुठून करायच्या आणि कुणाला वेळ असतो त्यासाठी . 

आताच्या काळात तर शिक्षकाला शिकवायला वेळ नसतो . रोज नवीन फतवा . हे करा ते करा . NAAC चे काम , NBA उरावर , पेपर पाहिजेत , रिसर्च पाहिजे , यांव आणि त्यांव. कुठल्याही कॉलेजमध्ये जावा प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या मिटींगमध्ये बिझी ... साला कुणाला वेळच राहिला नाही . कुठून करणार Out of Box thinking.

Out of Box thinking करण एव्हढ सोप असत का ? 

Out of Box  विचार करणार पोरग, त्याचे  त्याच्या बापाला पटत नाही, ते शिक्षण क्षेत्राला झेपत नाही , नोकरी करताना सहकाऱ्याना आवडत नाही (काही तरी नवीन ख्याट काढत म्हणून ...) आणि समाजाशी त्याच कधी जमत नाही . अशा माणसाला जर खमका असा शिक्षक, वरिष्ठ, सहकारी   मिळाला तर त्याचा त्या संस्थेला , समाजाला फायदा नक्कीच होतो .पण अशी उदाहरणे विरळच आहेत.कितीतरी out of box विचार करणारे  समाजाने वाळीत टाकले आहेत . अशी कित्येक  वेगळ्या विचाराची  माणसे  समाजाने कुजवली, मारून टाकली . आपल्याकडे परंपराच आहे .इतिहास आहे . 

"बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको "  ,अशी जीवनशैली बाळगणारी माणसेच इथे  जीवनात यशस्वी  होतात. जास्त डोकं चालवणे म्हणजे सगळ्यांची नाराजी ओढवून घेणे असाच इथे अर्थ निघतो .

Out of Box thinking करायची सवय लहान वयातच लावायची असते. त्यासाठी विचार करण्यासाठी अभ्यासक्रमात जागा करायच्या असतात . अभ्यासक्रम हा लवचिक असावा लागतो . प्रत्येक मुलाचा वेगळा विचार करायला लागतो . हे आपल्या शिक्षण क्षेत्राला जमणार आहे का ? अभ्यासक्रम तयार करणाऱ्याला स्वतःचा कार्यानुभव लागतो. आपल्याकडे ज्याने कधीच शेती केली नाही तो शेती कशी करायची याचे धडे देत फिरत असतो त्यामुळे त्याच्या पद्धती उपयोगी पडत नाहीत . 

आता हे खूपच अवघड झाल आहे .... याच्यावर उपाय आहे .. आता नवीन स्वायत्त विद्यापीठे होत आहेत त्यांनीच मनावर घेतलं तरच  होईल .......... (हा एक भोळा आशावाद आहे कारण २००७ पासुन १६ वर्षे झाली हे अजूनही शिक्षण क्षेत्राला जमलेलं नाही  ).



चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी अवश्य भेट द्या dearengineers.blogspot.com


Wednesday, August 30, 2023

 गेल्यावर्षीची गोष्ट आहे  एका गृहस्थाच्या घरी जायचा  जाण्याचा योग आला होता. गृहस्थ चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. घरात गेल्यावरच एक वेगळच वातावरण जाणवलं. या गृहस्थाची मुलीला करोनापुर्वी अपघात झाला होता त्यामुळे कमरेखाली हालचाल बंद झाली होती. एक वयात आलेली मुलगी म्हणजे आईवडिलांच्या डोक्यावर एक वेगळंच टेन्शन असतच ते कुणालाही चुकलेल नाही .

 काय करायचं पुढ हा प्रश्नच होता. आता मी काय बोलणार मुलगी तर फार्मसी झालेली आता इंजिनियरिंग झालेली असती तर काय आपल्याला काहीच टेन्शन नाही . कुठलीही ब्रांच असो आणि कितीही वेळा नापास असलं तरी अशाना मार्गी लावण्याचा आपल्याला चांगलाच अनुभव आहे पण हि पोट्टी तर फार्मसीची काय सांगणार?

 तस फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी पण खूपच संधी आहेत पण आमच्या अभियांत्रिकीच्या शिक्षण क्षेत्रासारख फार्मसीच्या शिक्षण क्षेत्राचं पण झाल आहे. ठराविक साच्याच्या बाहेर जावून विद्यार्थ्यांसाठी नवीन  संधी शोधायच्या , निर्माण करायच्या नावान तिथंही सावळा गोंधळच आहे . सध्याच्या काळासाठी  फार्मसिसाठी पण  टेक्निकल ब्रिज कोर्स बनवायला पाहिजे त्याला अजुन सुरुवातच नाही ( याला संदर्भ मी आता गेल्या आठ वर्षापासुन फार्मसी कॉलेजमध्ये जी काही एफ डी पी  आणि विद्यार्थ्यासाठी जे प्रोग्राम होतात त्याचे अभ्यासक्रम वाचले त्याचा आहे  ) आता काय बोलणार .  गावाकड जावून एखाद मेडिकल काढून द्याव या पर्यंत विचार येऊन ठेपला होता . 

तेव्हढ्यात मुलगी व्हील चेअर वर बसून आली . थोड्या गप्पा झाल्या आणि लगेच कळल पोरगी हुशार आहे आणि आपल्या पटात बसणारी आहे. मग माज्या डोक्यात पण एक विचार आला आणि मग मी बोलायला सुरुवात केली . पायथोनला डिमांड आलेली होती . मी पण पन्नास हजार रुपये भरून ज्ञानात भर टाकायला एक कोर्स केला होता त्यामुळे यामध्ये असणाऱ्या संधी लक्षात आल्या होत्या आणि त्या मला फार्मसीला मॅप कशा करता येतील याचा थोडा अंदाज आला . आणि समजा काहीच नाही झाल तर नवीन संधी निर्माण कशा करायच्या याचा  थोडा आराखडा बांधला. त्याच काय सल्ला देणं सोप असत पण त्याची जबाबदारीपण घ्यायला लागते त्यामुळे थोडा विचार केला आणि बोलायला सुरुवात केली . इथं मोठा प्रश्न होता तो म्हणजे करियरच बदलायचं होत त्यामुळे मी पण थोडासा दडपणाखाली होतो. 

पण त्यामुलीने पण उत्सुकता दाखवली मग आमची बरीच चर्चा झाली . आमचे एक जवळचे सर आहेत  जयंत जाधव  म्हणून . त्यानापण  फोन केला .  जयंत सरांचेपण खूपच आभार मानले पाहिजे आजपर्यंत कितीतरी विद्यार्थ्यासाठी मी त्याना फोन लावला आणि त्यांनीपण वेळ काढून विद्यार्थ्याना जमेल तसे मार्गदशन केल आहे त्यामुळे माझा फोन आला कि काय बोलायचं हे त्यांनाही अंदाज आहे .

त्यामुळ त्यांनीही थोड मार्गदर्शन केलं. मग तिचा कल पाहण्यासाठी परत जाधव सरांनी सांगितलेल्या यु ट्युबवरच्या विडीयो शेअर केल्या त्यावर त्या मुलीने पण अभ्यास केला . तिलापण अंदाज आला . मग तिच्या वडिलांनी तिला कोर्स लावला. तीन पण मनापासून अभ्यास केला. मी पण तीन चार वेळा फोन केला आणि विचारपूस केली तस तिला जास्त काही सांगण्याची गरज पडली नाही तीन चांगलच मनावर घेतलं होत. बघता बघता दिवस उलटून गेले आणि तिचा कोर्स संपला आणि तिच्यापेक्षा पण मला जास्त टेन्शन आलं. कारण सल्ला दिला होता आणि पोकळ सल्ला द्यायची मला पण सवय नाही त्यामुळे मीपण इकडं तिकड विचारपूस  करायला सुरुवात केली होती . 

ती मुलगी पण आत्मविश्वासाने इंटरव्यू देत गेली आणि शेवटी सरांचा फोन आला कि तिला चांगल्या एम एन सी कंपनीमध्ये पूर्णकाळ ऑन लाईन जॉब मिळाला आहे आणि पॅकेज पण चांगल मिळालं आहे . हे ऐकल आणि जीव भांड्यात पडला ...           

मुलीच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा . 

   डॉल्फिन लॅबच्या आणखी एका शुभेच्छेला यश मिळाल.


Sunday, February 26, 2023

***** गतकाळाची होळी होवो , नवी पिढी उदयाला येवो *********

 

***** गतकाळाची होळी होवो , नवी पिढी उदयाला येवो *********

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥  -----कवी – वसंत बापट

 

करोना हि देशावर ओढवलेली मोठी आपत्ती होती पण हाच  करोना खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन यांच्यासाठी एक इष्टापत्ती ठरला . करोनापूर्वीच   या क्षेत्राला आधीच घरघर लागली होती पण करोनामुळे या क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली .  कमी होणारी विद्यार्थी  प्रवेशांची संख्या आणि नियमित द्यावे लागणारे शिक्षकांचे पगार यामुळे कित्येक शिक्षण संस्था या डबघाईला आलेल्या होत्या. कित्येकांना हा पगाराचा डोलारा सांभाळणे मुश्कील झाले होते  पण करोना आला आणि संस्थांचे नशीब पालटले.  अनियमित होणाऱ्या पगारामुळे आणि आय टी क्षेत्रात आलेल्या बुममुळे बरेच शिक्षक जॉब सोडून गेले . काही  ठिकाणी शिक्षकांना या संधीचा फायदा घेऊन काढून टाकले गेले . जे आहेत त्यांचा पगार निम्मा केला . इन्फ्रास्ट्रक्चर वापर खर्च शुन्य झाला . कन्झ्युमेबल  वरचा खर्च वाचला , असे अनेक खरच वाचले . विद्यार्थ्याकडून १०० टक्के फी वसुली झाली. ज्याठिकाणी शिक्षक पगारासाठी संप ,कुरकुर करत होते त्यानाही  निमुटपणे काम करण्याशिवाय पर्याय उरला नाही .

ऑन लाईन परीक्षेमुळे बऱ्याच वर्षापासून अडकून असलेल्या विद्यार्थ्यांची सुटका झाली .   दहावी , बारावी मध्ये मार्कांची खैरात केली गेली त्यामुळे तंत्रनिकेतन आणि महाविद्यालयांचे प्रवेश वाढले . यामुळे अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनाच्या बेंडकुळीत बळ वाढले.

खर म्हणजे हि स्थिती जास्त काळ टिकणारी नाही आणि याचा पण अंदाज घेउन पुढे मार्गक्रमण करण्याच्या दिशेने कुणीही प्रयत्न करत नाही . प्रत्येकजण जल्लोषात मग्न आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा काय आहे हे विचारात घेउन त्यांना या क्षेत्राची गोडी कशी लागेल , त्यांच्यात कोशल्य कसे वाढेल याचा कुणीही विचार करत नाहीत . करोना काळात जो मिळालेला (वाचलेला ) पैसा आहे त्याचा योग्य विनिमय करून विद्यार्थ्यांचा पर्यायाने  महाविद्यालयाचा दर्जा कसा वाढवायचा याचा विचार कोणीही करताना दिसत नाहीत . उलट करोना काळात पैसे वाचण्याच्या ज्या क्लुप्त्या मिळाल्या त्याचाच वापर करताना बरेचजण दिसत आहेत .

मध्यंतरी म्हणजेच करोनापूर्व काळात ढकलगाडीतून आलेल्या विद्यार्थ्यामुळे बर्याच चुकीच्या प्रथा पडल्या होत्या त्या बंद करून आता आलेल्या विद्यार्थ्यांना एका नवीन साच्यात टाकायची हि एक अनमोल संधी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र गमावत आहे असे मला वाटते.  त्यांच्यामध्ये  अभियांत्रिकी शिक्षणाविषयी प्रेम वाढवण्याऐवजी फालतू अभिनेते , अभिनेत्री  यांच्या चित्रपटांचे प्रमोशनच्या कामाच्या सुपाऱ्या घेणही बऱ्याच ठिकाणी चालले आहे . दहा दहा दिवस गदरिंग आणि खेळाचे कार्यक्रम आयोजित करून आपण विद्यार्थ्यांचे पर्यायाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचे अफाट नुकसान करत आहे हे यांच्या गावीही नाही . कारण या कार्यक्रमापूर्वी किमान दहा दिवस आणि हे कार्यक्रम झाल्यावर किमान एक आठवडा अशाप्रकारे किमान विसतीस दिवस  विद्यार्थी हे वेगळ्याच मानसिकतेत वावरत असतात.

 ज्या  ठिकाणी तंत्रज्ञानाचे सोहाळे झाले पाहिजे , अभियांत्रिकी क्षेत्रातील नामवंतांचे विद्यार्थ्याना विचार मंथन आणि  मार्गदर्शन झाले पाहिजे त्या ठिकाणी टुकार कार्यक्रमाचा भडीमार सुरु झालेला आहे .  निरो म्हणे रोम जळत असताना फिडल वाजवत बसला होता तस या आगीच गांभीर्य ध्यानात न घेता आम्ही हातपाय शेकत बसलो आहे .

हि अडमिशनची परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही . बाहेरच्या जगात मंदीच वातावरण आहे . हि मंदी भारताच्या उंबरठ्यावर येउन ठेपली आहे . आपली लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे आपला देशच हा मोठ मार्केट आहे हे विचारात घेउन आता आपल्या विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे . विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कौशल्यवान बनविल तर त्यांचा मार्ग तेच निवडतील हे सोप काम करण्याऐवजी आम्ही  सर्व शिक्षक वर्गाला कसली कसली कागदे गोळा करणे आणि रंगवणे यात अडकून टाकत आहे . रोज नवीन संकल्पनेच मढ , अभियांत्रिकी  शिक्षणक्षेत्राच्या पर्यायाने शिक्षकाच्या गळ्यात मारले जात आहे .

जर गायीला  दुध येत नसेल तर योग्य औषधोपचार करणे आणि तरीही फरक नाही पडला तर  शेवटी  गायीला बदलण्याऐवजी  धार काढणारा बदला , गोठा बदला , गोठा रंगवा , गोठ्यावर यंत्र लावा , गायीच्या गळ्यात ताईत बांधा आणि शेवटी धार काढणाऱ्याला बदला किंवा गाय खूपच दुध देते अस सर्टिफिकेट विकत घेउन मिरवा असला प्रकार जो चालला आहे तो बंद करण्याची खरी गरज आहे .

 

बऱ्याच ठिकाणी स्वायत्ततेच वार आलं अशावेळी वरून आलेल्या योजना , कार्यक्रम यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून ज्यांचा विद्यार्थ्यांना फायदा होणार नाही अशाना गळ्यात मारून न घेता उलट त्यावर प्रश्न विचारले पाहिजे. संस्थापाकासाहित सर्वांनी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राच्यामुळे आपलं घर चालत आहे त्यामुळे आपल्या महाविद्यालयात चांगले प्रवेश झाले पाहिजेत आणि त्यासाठी कमीत कमी खर्चात चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याना कस कौशल्य पूर्ण बनवू असा स्वार्थी विचार केला पाहिजे . करोडो रुपये खर्च करून मोठमोठ्या प्रदर्शनीय प्रयोगशाळा बांधण्याऐवजी कमीत कमी खर्चात विद्यार्थ्यांना कस कौशल्यपूर्ण बनवता येईल याचा विचार केला पाहिजे (नवीन लेखाचा विषय मिळाला लवकरच यावरही लिहीनच )

सध्या हि वेळ संक्रमनाची आहे . हे क्षेत्र स्थिती बदलत आहे  आणि हिच  वेळ आहे ती नवीन प्रथा पाडण्याची , अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचा कायाकल्प करण्याची  ज्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला परत उर्जितावस्था येईल त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची  .

 

 

आपले विचार अवश्य मांडा

चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dearengineers.blogspot.com