Sunday, November 15, 2015

पुराणामधील लपलेले इलेक्ट्रॉनिक्स – भाग १


भारतीय संस्कृती हि जगामधील अनेक प्राचीन संस्कृती मधील मानाची संस्कृती आहे. हिचे मोठेपण आजही सारे जग मानते. जगातील अनेक ज्ञानी आणि महाज्ञानी लोकांनी तिचे मोठेपण निर्विवादपणे मान्य केले आहे. सगळ्या जगातील ज्ञान हे वेदामध्ये आणि पुराणामध्ये लपले आहे. अर्थात हे ज्ञान प्रतिकात्मक उदाहरणामधून आणि गोष्टीमधून सांगितलं आहे . सगळ जग त्यामधील ज्ञानाचा अर्थ लावत आहे ,त्याचा अभ्यास करत आहे अस असताना आम्ही मात्र कटोरा घेउन जगाकडे ज्ञानाची भिक मागत फिरत आहोत.
लहानपणापासून आपण गोष्ट ऐकतो. सूर्याच्या रथाला सात घोडे आहेत आणि सूर्याचा सारथी आरुणी हा पांगळा आहे हे वेदामध्ये आणि पुराणातही लिहिले आहे. अनेक लेण्यामध्ये त्याचे शिल्पही आढळते. आपण हि एक पुराणातील एक बकवास गोष्ट आहे म्हणुन सोडुन देतो ,त्यावर विचार करत नाही. एकदा सहज या गोष्टीवर विचार करत होतो. सूर्याच्या रथाला असणारे घोडे हे सातच का आणि त्याच्या रथाचा सारथी हा पांगलाच का हे कोडं मला काही केल्या उकलेना.
सात घोडे एकाच बाजूला लावुन असा त्या सूर्याच्या गतीवर काय फरक पडणार होत ?
कि सूर्याच वजन अस किती जास्त होत कि त्याला सात घोडे रथ ओढायला लागत होते?
आणि सूर्य इतका जड असेल तर त्याने घोड्याऐवजी हत्ती का जोडला नाही?
सूर्यदेवाने आपल्या रथाचा सारथी म्हणुन पांगळ्या आरुणीचीच निवड का केली ?
खुपच विचार केला मग माझ्या लक्षात आलं कि पांगळा माणुस हा हातात दोर पकडून बसला तर त्याचा आकार हा त्रिकोणासारखा दिसतो. हे लक्षात आलं आणि झरझर सर्व लक्षात आलं कि सूर्य आणि सात घोडे यांच्या मध्ये असणारा त्रिकोण यांचा संबंध काय ते....
हा त्रिकोण म्हणजेच प्रिझम होय. आणि सात घोडे म्हणजेच प्रकाशामध्ये असणारे सात रंग म्हणजेच सूर्याचा प्रकाश हा सात रंगापासून बनला आहे आणि प्रिझमच्या सहाय्याने हे सात रंगाचे अस्तित्व आपल्याला पाहता येते हे वेद काळापासून माहित होत. प्रकाशाचा वेग हा खुपच जास्त असतो हे दाखवायला त्याकाळच्या सर्वात वेगवान अशा प्राण्याची म्हणजेच घोड्याची निवड केली होती. पण हे प्रतीकात्मक सांगीतलेमुळे आपल्याला ते कधी कळल नाही आणि सूर्याचा प्रकाश हा सात रंगापासून बनला आहे अस कोणी एक पाश्यात्य संशोधकाने प्रिझमच्या सहाय्याने शोधून काढले आहे हे सत्य आपण स्वीकारलं आणि त्याचा उदोउदो करू लागलो.
अशा बऱ्याच गोष्टी आपल्या पुराणात लपल्या आहेत. अशीच एक कथा समुद्र मन्थनाची. यामध्ये देव आणि दानव यांनी मिळुन समुद्र मंथन केलं आणि त्यावेळी समुद्रातून चौदा रत्ने निघाली. हि एक कथा मी यावर विचार करायला सुरुवात केला आणि या गोष्टीचा इलेक्ट्रोनिक्स असणारा संबंध माझ्या लक्षात आला . आपण पुढच्या भागात पाहु इलेक्ट्रोनिक्स आणि समुद्र मंथन.
आवडल असेलच आता शेअर करा. तुमची मते मांडा. यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी ब्लोगवर उपलब्ध आहेत.
www.dearengineers.blogspot.com चित्तरंजन महाजन,
डा. डॉल्फिन लॅब्स,पुणे
“डॉल्फिन लॅब्स” एक अशी लॅब्स जिथं भावी इंजिनियरांच्या कल्पनांना मिळेल वाव. स्वप्नांना मिळेल आकार. प्रयत्नांना मिळेल दिशा. सर्जनशीलतेला मिळेल मार्गदर्शन. डॉल्फिन लॅब्समध्ये आपले स्वागत आहे.