$$ अंतः अस्ति प्रारंभः
------ ऱ्हासपर्व -----
आठ वर्षापूर्वी नवरात्रीच्या काळातच २०१८ साली मी अभियांत्रिकी शिक्षण: दशा आणि दिशा या लेखमाला लिहायला सुरुवात केली. तिला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अभियांत्रिकी शिक्षणावर अधून मधुन बरेच लेख लिहिले. २०२३ नंतर लेख लिहीन कमी झालं मनात बरेच विचार असायचे मग लेखाच्या ऐवजी फक्त त्याचं शीर्षकच टाकत होतो पण ज्यांनी हि लेखमाला वाचली आहे त्यांना त्या शीर्षकावरूनच लेखाचा अंदाज यायचा. त्यांचे फोन यायचे.
या लेखमालेने खूप मित्र मिळवून दिले , मला माझी ओळख मिळवून दिली. मला वाटायचे कि लाईक जास्त नाहीत, जास्त व्ह्युव नाहीत पण हे लेख लोकं वाचत होते ,whats app वरून सगळीकडे फिरत होते. या लेखांचा काय फायदा झाला का? ज्यांना माझे विचार पटले त्यांनी जमेल तितकं बदलण्याचा प्रयत्न केला . काहीना माझ्या सूचना पटल्या त्याचा उपयोग करून नवीन योजना आणल्या आणि पैसे लाटले . काहीना माझ्या सडेतोडपणाचा राग आला त्यांनी कॉलेजच्या कँम्पसमध्ये मला येउ द्यायचं नाही असा अलिखित ठराव केला. काहींनी मला बोलावून एक पैसा न देता फुकट राबवून घेतले. बऱ्याच जणांनी पैसे बुडवले. काहींनी सुरुवातीला माझे लेख आपल्या नावानी खपवले . अशा बऱ्याच काही गोष्टी घडल्या. शेवटी काय अस्वल नाचायला तयार असले कि नाचवणारे हजार असतात. माझी सुरुवातीला चिडचिड झाली मग मी पण मस्त एन्जॉय करायला सुरुवात केली.
मी लिहिलेल आज बऱ्यापैकी सगळ खर ठरलं आहे. जे नवीन वाचक आहेत त्यांनी माझ्या टाईम लाईनवर मागे जाउन लेख वाचावे अथवा dearengineers@blogspot.com ला भेट देवून मागील लेख अवश्य वाचावेत . अर्थात त्यावर सारेच लेख नाहीत.
गेल्या महिन्यात मी ठरवलं कि या लेखांच एक पुस्तक बनवायचं. मग त्यासाठी परत ते लेख वाचायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं कि यात अजून बरच काही लिहायला पाहिजे आहे. ध्यास .... अभ्यास .... विकास ...परत ध्यास......अभ्यास..... विकास हि एक साखळी सर्वांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते पण या साखळीत जेव्हा विकासाच्या ऐवजी आभास येतो त्यावेळी ऱ्हास व्हायला सुरुवात होते. २०२० मधील कोविड काळापासून याला सुरुवात झाली आहे आणि आता ये चरम ठिकाणी पोहोचल आहे .
यातून बाहेर पडायचं कसं तर अंतः अस्ति प्रारंभः या वाक्यातच त्याचा मंत्र आहे . जोपर्यंत तुम्ही अंत स्विकारत नाही तोपर्यंत प्रारंभ होत नाही . सध्या सगळे भ्रमयुगात जगत आहेत . अगदी बुडून मरायची वेळ आली तरी All is well असं बोंबलत विनाशाच्या दिशेने एक एक पाउल टाकत आहेत. सत्याची जाणीव करून घ्या तरच बदलाला सुरुवात होईल. बिरबलाच्या गोष्टीतील माकडीणीसारखी सर्वांची अवस्था झाली आहे फक्त याठिकाणी आपण दुसऱ्यांची पोर पायाखाली घेत आहोत याचाच अर्थ आपल्या स्वत:च्या पोराला पण कुणीतरी दुसरा त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या पायाखाली घेणार आहे आणि आपल्याला हतबलपणे पाहायला लागणार आहे. हे माझ्या घरात येऊन पोहोचल आहे. अर्थात मी त्यावर मार्ग काढेन पण इतरांच काय हे जाणून मी परत लिहायला सुरुवात करत आहे. सर्वजण आहेत म्हणून जग आहे आणि सर्व आनंदात असतील तरच स्वत: च्या आनंदाला अर्थ आहे ...... शेवटी सगळ इथंच सोडून जायचं आहे.
या सगळ्यावर सविस्तरपणे बोलूच . तुम्ही या लेखमालेला प्रतिसाद द्यालच हि खात्री आहे.
डॉ. चित्तरंजन महाजन.
९७६३७१४८६०
See less
No comments:
Post a Comment