ऱ्हास पर्व – ( भाग ६ )
Inter disciplinary (आंतर शाखीय) विषय – सवतीची पोरं
थोडा मागच्या भागाचा संदर्भ घेऊन पुढे जाऊया.
तर अजून एक विद्यार्थी होता. तो तर
पुण्यातील अतिशय नामांकित विद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनियरिंगला
दुसऱ्या वर्षाला होता. कॉलेजच नाव आणि ब्रँचच नाव ऐकून माझी उत्सुकता जागी
झाली. म्हटल तुला काय विषय आहेत. त्यानं
विषयांची नाव सांगितली. त्यात एक विषय तर बँकिंग संबंधित होता. हा विषय ऐच्छिक होता आणि पुढे तो त्याच संबंधित
एक एक विषय त्याला प्रत्येक सेमला होता. मग
सहज त्याच्या पूर्ण चार वर्षांचा अभ्यासक्रम पाहिला आणि मग लक्षात आल की सगळच गंडल
आहे.
Inter disciplinary विषय आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग या दोन शब्दांच
आमच्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला काय गारुड आहे हे मला कधी कळलंच नाही .
यातील प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग या विषयावर पुढच्या काही भागात सविस्तरपणे बोलू सध्या आपण आंतर शाखीय विषयावर बोलू .
आंतर शाखीय विषय हे इलेक्ट्रॉनिक्सला पहिल्यांदा आले ते
म्हणजे प्रोग्रॅमिंगचे विषय. यात basic, fortron , cobol ,pascal यांनी सुरुवात झाली. त्यानंतर आले c
प्रोग्रामिंग . सुरुवातीला c प्रोग्रामिंग शिकण म्हणजे डोक्याला
तापच होता. त्याचा संबंध इलेक्ट्रॉनिक्सशी काय आहे हे कुणालाच समजत नव्हत. पण जस मायक्रोकंट्रोलरचे progaming c मध्ये
होऊ लागल त्यानंतर खऱ्या अर्थाने तो विषय इलेक्ट्रॉनिक्सशी वरोबर मॅप झाला. मायक्रोकंट्रोलरच्या
आधी PC च्या मदरबोर्डवर असणाऱ्या
स्लॉटमध्ये वेगवेगळे कंट्रोल कार्ड बसवून ऑटोमेशन केलं जायचं त्यासाठी c प्रोग्रामिंग वापरलं जायचं पण ते कधीही शिकवलं गेलंच नाही आणि असं काही होतं
ते सुद्धा जास्त लोकांना माहिती नाही.
आणखी एक विषय असायचा उद्योजकता
विकास ( Enterprenuership
Development) हा विषय आज ही शिकवला जातो. पण त्याचं अजूनही शाखानिहाय maping झालेल नाही. तसं पाहिलं तर हा विषय अभियांत्रिकीच्या अगदी दुसऱ्या वर्षापासून
शिकवायला पाहिजे. आज भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीस लावण्यासाठी या विषयाची अतिशय गरज
आहे. पण त्यासाठी पारंपारिक पद्धतीने हा विषय न शिकवता अभ्यासक्रमाशी सांगड घालून या
विषयाचा अभ्यासक्रम बनवला पाहिजे.
त्यानंतर आला तो म्हणजे Mechatronics.
अतिशय चांगला विषय पण त्याच हाल कुत्रं खात नाही. हा विषय मेकॅनिकलला असला कि
त्याचा अभ्यासक्रम इलेक्ट्रॉनिक्सवाले बनवतात आणि तो विषय इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांनी
शिकवावा असा अट्टाहास केला जातो आणि तो जर इलेक्ट्रॉनिक्सला
असला तर त्या विषयाचा अभ्यासक्रम मेकॅनिकलवाले
बनवतात आणि तो मेकॅनिकलच्या गळ्यात टाकला जातो. आणि जरी तो विषय त्या त्या डिपार्टमेंटच्या
शिक्षकांनी घ्यायचा म्हटला तर तो विषय जणू
सवतीच नावडत पोरग असल्याच्या भावनेतून शिकवला जातो. आजतागायत एकही कॉलेज तो विषय
मनापासून शिकवताना आणि योग्य पद्धतीने घेताना मी पाहिलेला नाही. त्यावरची सगळ्यात
मोठी गोष्ट म्हणजे ज्याठिकाणी Mechatronics अथवा Robotics यांच्या
खास अशा वेगळ्या शाखा आहेत तिथ सुद्धा हीच बोंब आहे.
बहुतांशी सगळीकडे हेच चालल आहे.
याचा अर्थ बँकिंग हे इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर शाखेला चालणार
नाही अस माझ मत अजिबात नाही पण आपण हा विषय इंजिनियरिंगला शिकवतोय यांचे भान ठेवून
त्याच्यामध्ये जो पूर्ण कॉमर्सचा टच दिला आहे
त्याला इलेक्ट्रॉनिक्सचा टच दिला पाहिजे.
जाता जाता एक अजून एक
गंमत सांगतो. मला एका
कॉलेजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डिपार्टमेंटला बोलावल होत. IoT हा विषय दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यानां
कसा शिकवायचा यांचे शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी. कॉलेज स्वायत्त झालेलं होत. तिथ गेलो आणि त्यांनी त्या विषयाचा बनवलेला अभ्यासक्रम हातात दिला आणि आश्चर्याचा धक्का बसला
. त्या IoT विषयी काहीच नव्हत. त्यात थोड फार IoT शी संबंधित होत ते पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्स
संबंधित होत आणि त्याचा त्या विद्यार्थ्यांना काहीही भविष्यात उपयोग होणार नव्हता.
त्यातही तो विषय फक्त थेअरी होता. त्याला प्रक्टिकलच नव्हत. मलाच कळल नाही यावर काय
बोलायच . तसं काहीतरी बोलल असतो तरी चाललं असत पण मनाला पटलं नाही त्यामुळे तसाच परत
आलो.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शाखेसाठी IoT तर हा विषय अतिशय महत्वाचा आहे. येणाऱ्या काळात edge Devices making and
development च्या मोठ्या अवाढव्य क्षेत्राची निर्मिती व्हायला सुरुवात झाली
आहे त्यामध्ये या विषयाची अतिशय महत्वाची भूमिका आहे.
आजच्या जगात तसं पाहिलं तर सगळ्या शाखांच
एकत्रीकरण होत आहे. आज चालणाऱ्या अत्याधुनिक
मेकॅनिकल गोष्टीना नियंत्रित करण्यासाठी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो, त्यांचे ऑटोमेशन करण्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा
आणि त्यांना इंटेलीजंट बनवण्यासाठी AI च्या
वेगवेगळ्या अल्गोरिदमचा वापर केला जातो .
त्यामुळे आज प्रत्येक शाखांचा अभ्यासक्रम
करताना वरील सर्व गोष्टींचा विचार करून ते विषय त्या शाखेशी एकजीव करून घेण्याची सध्याची
अतिशय मोठी आणि आव्हानात्मक गोष्ट सध्या शिक्षण
क्षेत्रापुढे उभी आहे.
धन्यवाद,तुमचे मत अवश्य मांडा.
डॉ. चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
९७६३७१४८६०
No comments:
Post a Comment