Sunday, October 21, 2018

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग 3)

 *** सडणारी बुद्धीमत्ता आणि नासणारी स्वप्ने  ***
सध्याच्या अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीचा  सगळ्यात मोठा दुष्पपरिणाम म्हणजे  मुलांची बुद्धी सडत आहे कारण बुद्धी विकासाच्या  वाचन ,चिंतJन, मंथन या ज्या पायऱ्या आहेत त्याच या शिक्षण पद्धतीने काढून टाकल्या आहेत आता केवळ जमलं तितकं वाचन आणि कुंथण या दोनच पायऱ्या आहेत. एका नावाजलेल्या विद्यापीठाने चालू केलेल्या ऑनलाइन objective प्रकारच्या अभिनव परीक्षा पद्धतीबद्दल तर काही बोलायलाच नको. या पद्धतीत तर चिंतन ,मनन याला फाटाच दिला आहे.
पक्का अभियंता घडणेसाठी त्याची अभ्यासाची पध्द्त ही      फुलपाखरांच्या सारखी असावी. फुलपाखरू जेव्हा अंड्यातून बाहेर येते तेव्हा त्याची सुरवंटा अवस्था असते या अवस्थेत ते खूपच खादाड असते खाण, खाणं आणि फक्त खाणं एव्हडाच त्याचा उदयोग असतो नंतर ते कोषावस्थेत जाते,बराच काळ ते कोषावस्थेत असते आणि एक दिवस ते कोषावस्थेतुन निघते आणि आपले रंगबिरंगी पंख फडकवत फिरू लागते.
त्याच प्रमाणे अभियंता हा ज्ञान पिपासू पाहिजे मिळालेल्या ज्ञानाचे त्याने चिंतन केलं पाहिजे आणि त्या चिंतनातून मिळालेले सार हे त्याला मिरवता आले पाहिजे.
आपल्याकडे वरील गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं निव्वल पुस्तकी ज्ञानावरच्या पदव्या या मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करू शकत नाहीत , आणि त्यांचे मनात शिक्षणाविषयी काहीही किंमत उरत नाही आणि एक प्रकारे चार पैशाच्या फायद्यासाठी एक मेंदू सडला जातो.
यापेक्षाही वाईट गोष्ट आहे ती म्हणजे त्या मुलांच्या पालकांची होणारी तगमग. आयुष्य शेतात xxxपर्यंत माती जाऊपर्यंत काम करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांकरी बांधवांची, आयुष्य खडतर गेलं पोरांच्या वाट्याला अस आयुष्य येऊ नये असा विचार करणाऱ्या अनेक पालकांची, पोराच्या शिक्षणासाठी शेताचा तुकडा विकणाऱ्या पालकांची, आयुष्य कचऱ्यागत गेलं आता पोरगं शिकून काहीतरी पांग फेडल अशा अनेक पालकांची स्वप्ने आता नासायला सुरुवात झाली आहे.
इंजिनिअरिंग म्हणजे आता विनोदास्पद गोष्ट झाली आहे. आधीच आपला अभ्यासक्रम हा दहा वर्षे मागं आहे असे बोंबलून उदयोग क्षेत्र सांगत आहे आता वेळीच जर यावर विचार नाही केला तर अजून दहा वर्षे मागे फेकले जाण्याचा धोका आहे.
आता प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयापुढे मुलांच्या ऍडमिशन ची खूपच मोठी समस्या उभी राहिली आहे. वाढलेली महाविद्यालयाची संख्या, बाजारातील कमी झालेली मागणी आणि यामुळे हुशार मुलांचा या शाखेकडील कमी होणारा कल यामुळे आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कॉलेज जगवण्यासाठी अक्षरशः बाबा पुता करून आणलेली मुले ...याना या शिक्षणात रसही नाही आणि त्यांचा तो वकुबही नाही अशा मुलाचा केलेला भरणा, मग त्या मुलांना पास करण्यासाठी करावी लागणारी केविलवाणी धडपड, त्यांच्यासाठी कमी करावे लागणारे अभ्यासक्रमातील आणि परीक्षेतील काठिण्य आणि त्यामुळे मुलांच्या गुणवत्तेत परत होणारी घट हे असं एक नवीनच दुष्टचक्र सुरू झालं आहे. One night इंजिनिअर ही नवीन संकल्पना आता उदयास आलेली आहे. मागील दोन परीक्षांचे पेपरचा जरी अभ्यास केला तरी स्कोअरिंग होईल अशी निघणारी प्रश्नपत्रिका ही कशाची द्योतक आहे? मग एव्हढ करायचं तर डायरेक्ट पदवीच हातात द्यायची.... अरे काय चाललंय काय? हे बदलता नाही का येणार ? आता केवळ पालकांचंच नांही तर या देशाच महासत्ता बनण्याचं स्वप्नच आता नासायला लागल आहे.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860

1 comment:

  1. .....इंडस्ट्री नुसती बोंबलते कि दहा वर्ष मागे आहे syllabus पण स्वतः मात्र काही प्रयत्न करत नाही .....राहिला प्रश्न युनिव्हर्सिटीने syllabus change करण्याचा तर मला वाटते त्याला ही काही मर्यादा आहेत....industry च्या demands ह्या dynamic आहेत त्यात दर दिवशी काही न काही नाविन्य आहे त्याला कोणतीही युनिव्हर्सिटी match करू शकत नाही किंवा कॉलेज देखील करू शकत नाही.....त्यात आणि कोणता विद्यार्थी पुढे जाऊन कोणत्या इंडस्ट्री मध्ये काम करेल हे त्या विद्यार्थ्याला देखील माहित नसते उदा. mech चा विद्यार्थी manufacturing,design, quality etc. मध्ये कुठे काम करेल हे कोणीही तो शिकताना सांगू शकत नाही ....

    ReplyDelete