Saturday, November 3, 2018

अभियांत्रिकी शिक्षण : दशा आणि दिशा (भाग १०)



**** इंटर्नशिप :- कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. ****

अभियांत्रिकीच्या मुलांना आजकाल जे पुस्तकाधारित आणि  घोका आणि ओका या पद्धतीने शिक्षण दिले जाते त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रॅक्टीकल ज्ञानाचा अभाव झालेला आहे . केवळ यामुळेच अप्रशिक्षित असे अभियंते निर्माण झालेने या शिक्षण व्यवस्था आता पूर्णपणे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खरं म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणाचा हेतूच हा कुशल आणि कौशल्यपुर्ण  असे मनुष्यबळ निर्माण करणे आहे. म्हणजेच इंजिनियर आहे म्हणजेच तो प्रॅक्टीकल ज्ञानात पारंगत तो कौशल्यपूर्ण  आहे हे अभिप्रेतच आहे. पण थेअरी आणि मार्क्स याला दिलेले अवास्तव महत्व यामुळे मुलांचे प्रॅक्टीकल करण्यातून लक्षच उडून गेले  आहे.
प्रॅक्टीकल नाही तर मिनी प्रोजेक्ट करता येत नाही, जर मिनी नाही तर फायनल इअरचा मेगा प्रोजेक्ट करता येत नाही अशा तऱ्हेने पूर्णपणे आत्मविश्वास गमावुन बसलेली मुले जेव्हा हातात पदवीचा कागद घेऊन मार्केटमध्ये येतात तेव्हा त्यांना कोअरमध्ये जॉब मिळणे कठीणच जाते.
यामुळे मुलांना प्रॅक्टीकल ज्ञान मिळावे या उद्देशाने इंटर्नशिप प्रोग्राम राबवण्यासाठी संस्थाना  प्रोत्साहित केले जाते. यामागे  विद्यार्थ्याने एखाद्या उद्योगात जाउन थोडं कौशल्य  आत्मसात करावं हा या मागे उद्देश असतो.
हा काही नवीन प्रघात सुरु केलेला नाही . बऱ्याच विद्यापीठांनी वीस वर्षापूर्वीपासून त्यांच्या अभ्यासक्रमात इंटर्नशिप प्रोग्रामचा समावेश केलेला आहे. पण याच फलित काय ? जवळ जवळ ९० टक्के मुलांना इंटर्नशिप मिळत नाहीत मग ते इंटर्नशिपचे सर्टिफिकेट पैसे घेऊन विकत घेतात. आजकाल अशी पैसे घेउन सर्टिफिकेट देणारी दुकान पार जिल्हा पातळीपर्यंत उघडली गेली आहेत.
या इंटर्नशिप प्रोग्राम बाबतीत एक मोठा विनोद आहे . तो म्हणजे पोरांनी अडमिशन घ्यायचं शिकण्यासाठी महाविद्यालयात . त्यांसाठी पैसे भरायचे कोलेजला आणि कॉलेज आणि  विद्यार्थी अपेक्षा करतात कि उद्योगानी त्यांना फुकट प्रक्तीकाल ज्ञान द्यावे त्यावर कळस म्हणजे त्यांनी त्या काळात पैसेही द्यावे . कसं शक्य आहे . आणि त्यांनी का द्याव? ह्या इंटर्नशिप प्रोग्रामच्या आड शिक्षणसंथा आपली जबाबदारी झटकून टाकत आहेत .
काही मोठे उद्योग असतात ते या मुलांना पैसे देउनही घेतात पण त्यामागे त्यांचा उद्देश वेगळा असतो तो म्हणजे खर्च दाखवणे किंवा सरकारने त्यांना सक्ती केली आहे म्हणून किंवा त्यांचा जो एक का दोन टक्के फंड आहे तो समाजासाठी  खर्च दाखवायचा असतो म्हणून. यात त्यांना विद्यार्थ्यांना शिकवावे असा सगळ्याच उद्योगाचा उद्देश नसतो. नगाला नग दाखवला ..झाल . मग यामध्ये विद्यार्थ्याची शाखा काय आहे आणि त्याला काय शिकवायचं अस काही नसते . ब्रंच कुठलीही ..प्रशिक्षण काहीही .
आता लहान उद्योग इथे स्वत:चं काम या विद्यार्थ्यांना का शिकवतील आणि शिकवायचं आणि ते शिकणार आणि दुसऱ्या ठिकाणी जाणार मग याचा त्यांना फायदा काय ? बर या मुलांना शिकवायचं म्हणजे पार शून्यातून शिकवायला लागत. एखादं काम त्यांचेवर सोपवलं तर ते करतील याचाही नेम नाही . मनात आले सोडून जायला मोकळे त्यामुळे त्यांचेवर काही जबाबदारीच काम टाकता येत नाही . माझ्या एका ओळखीच्या उद्योगपतीने फुकट मिळतात किंवा पैसे द्यावे लागत नाहीत म्हणून तीन विद्यार्थी ठेवले आणि त्यांचे हातून अशी चूक झाली कि पाच सहा लाखाचा फटका बसला.आता त्याची हौस पूर्णपणे फिटली आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. याची जबाबदारी घेणार कोण ?
आता तर सहा महिन्याची इंटर्नशिप विद्यार्थ्याने करन हे सक्तीच करत आहेत .. झालं म्हणजे म्हणजे आता सर्टिफिकेटची किंमतही वाढणार. आणि एव्हड्या विद्यार्थ्यांना जर उद्योगांनी ठरवलं चला फुकट मिळतात सहा महिन्यासाठी तर वापरून घेऊ काय परिणाम होईल याचा विचार करा आणि येव्हडे उद्योगही नाहीत.
 जर सहा महिन्यासाठी विद्यार्थी बाहेर जात असतील तर त्या सहा महिन्याची फी महाविद्यालयाने का घ्यावी त्या ऐवजी ती त्या उद्योगांना द्यावी म्हणजे मुलांना पैसे भरावे लागणार नाहीत आणि उद्योग पण त्याना घ्यायला तयार होतील.



आपली मतं  ऐकायला नक्कीच आवडेल .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment